पान:गद्यरत्नमाला.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भर्तृहरि.

५१


तील सुधारलेल्या लोकांत श्रेष्ठ झाले आहेत.भूगोलाच्या सर्व प्रदेशांत आपली सत्ता त्यांनी पसरली आहे! मोठाल्या देशांत राजसत्ताक व लोकसत्ताक राज्ये त्यांनीं स्थापिलीं आहेत. अशीं राज्ये * तालमी व *खावो यांच्या स्वप्नींही आली नसतील. त्यांनीं एवढे आरमार जमविलें आहे कीं, तें एका अर्ध्या घटकेंत tarयर, आन्स, कार्थेज, वेनिस व जिनोआ या सर्व शहरांच्या एकंदर आरमारांचा विध्वंस करून टाकील. वैद्यशास्त्र, प्रवास व पत्रव्यवहार यांचीं साधनें, यांत्रिक कलाकौशल्य, शिल्प, किंबहुना मनुष्यांच्या सुखाचीं सर्व साधनें, त्यांनी इतकीं पूर्णतेस आणली आहेत की, पूर्वीच्या इंग्लिश लोकांस हा सर्व जादूचाच चमत्कार वाटला असता. भाषा इतकी उत्तम स्थितीस आणिली आहे, तीतील ग्रंथ ग्रीक भाषेतील ग्रंथांची सुद्धां बरोबरी करतील. ता- न्यांच्या गतींचे वगैरे ज्योतिषशास्त्रांतील पुष्कळ नियम यांनी शोधून काढिले आहेत. मानसशास्त्रावर यांनी पुष्कळ चातुर्ययुक्त विचार केले आहेत. राजकीय सुधारणेच्या कामांत इंग्लिश लोकांस सर्व लोक पुढारी मानतात.
'

भर्तृहरि.


 प्राचीन काळी आपल्या देशांत जीं पुरुषरत्ने होऊन गेलीं, त्यांपैकीच भर्तृहरि हैं एक होय. थोर पुरुषांची चरित्रे लिहि- लेलीं नाहींत ही एक हानिच आहे, याचें मोठें एक ठळक उदाहरण भर्तृहरिराजा होय. भर्तृहरिराजासारखे पुरुष आ- पल्या देशांतच काय, पण सर्व भूमंडळाचा इतिहास धुंडाळून पाहिला तरी, फारच थोडे सांपडतील. लक्ष्मी आणि विद्या ह्या


 *या उभयतांचे ग्रीक भाषेत उत्तम ग्रंथ आहेत. ↑ हीं प्राचीनकाळीं वेगवेगळाल्या वेळीं यूरोपांत आरमाराविषय प्रख्यात शहरें होतीं.