लोक अनुकूळ होतील, हें प्रत्येक मनुष्यास कळते. यामुळे लो- कांस आवडतील अशीच मतें बाहेर येतात. कोणीं भलतेंच एकादें मत काढिलें तर, त्याचे लागलीच खंडन होतें, म्हणजे तो तें टाकून देतो. आपल्या लोकांस वर्तमानपत्रांची योग्यता कळू लागल्यामुळे दरसाल त्यांची संख्या वाढत चालली आहे. आगगाडीसारखीं साधनें असल्यामुळे व सर्व ठिकाणी इंग्रजी भाषेचा अभ्यास सुरू असल्यामुळे लोकांस पाहिजे तेथील वर्त- मान समजतें, हा एक सुधारणेपासून केवढा लाभ आहे ? वर्त मानपत्रे व आगगाडी यांच्या प्रसारामुळेंच राष्ट्रीयसभेसारख्या संस्था उत्पन्न होणें शक्य झालें.
आपल्या देशांत सुधारणा हा शब्द सर्वतोमुखीं झाला आहे. पण त्याचा युरोपांतील सुधारलेले लोक अर्थ काय समजतात हैं। स्पष्ट कळण्याकरितां, लार्द मेकाले म्हणून एक विद्वान् इंग्रजी ग्रंथकार आहे, त्याच्या ग्रंथांतील कांहीं ओळींचा सारांश खालीं लिहिला आहे.
"इंग्लंदाचा इतिहास म्हणजे, खरोखर सुधारणेचा इतिहास होय. हा लोकांच्या मनांची स्थिति सतत कशी बदलते, देशांतील रीतिभाती कशा सुधारतात, याचा इतिहास होय. ह्यावरून आपणांस असें समजतें कीं, विद्यमानकाळीं आशिया खंडांतील कांहीं देश जसे अगदीं रानटी स्थितीत आहेत, त्यापेक्षां अधिक वाईट स्थितींत इंग्लंदांतील लोक बाराव्या शतकांत होते. तेव्हां ते थोड्याशा परकी लढाऊ लोकांच्या जुलमी अमलाखालीं चिरडलेले होते. त्या वेळेस विजयी नार्मन लोक व जिंकलेले साक्सन लोक यांच्यामध्ये पराकाष्ठेचा भेद होता. बहु- तकरून सर्व प्रजेची स्थिति गुलामांप्रमाणे होती. बहुशः सर्व लोक पशूप्रमाणे अज्ञानांत निमग्न होते. थोडेसे आपणास विद्वान् झणवीत, त्यांच्या ज्ञानास विद्या हैं नांव सुद्धां शोभत नाहीं. तेव्हां पा- सून आज सातशे वर्षांत ते, अज्ञानी, भिकार, रानटी लोक सर्व पृथ्वीं-