Jump to content

पान:गद्यरत्नमाला.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुधारणा.

४९


त्यांच्यांत ऐक्य आहे म्हणून, ते फुटाफूट झालेल्या लोकां- वर अम्मल करतात. शेवटले बाजीराव पेशवे यांनी पॉट्र या नां- वाचा एक साहेब दापोली येथे सैन्याच्या अधिकारावर नेमिला होता. त्यानें सैन्य चांगलें तयार ठेविलें होतें. इंग्लिश लोक पुणे घ्यावयास आले तेव्हां पेशव्यांनी साहेबास फौज घेऊन लढाईस बोलाविले. साहेब येईना तेव्हां त्याकडे पेशव्यांनीं मनुष्य पाठ- विला. त्यास साहेबानें जवाब सांगितला कीं "मी पेशव्यांचा नोकर आहे याकरितां त्यांच्या दुसऱ्या कोणत्याहि शत्रूबरोबर लढेन, परंतु इंग्लिश लोकांच्या अंगावर जाणार नाहीं. दुसऱ्याकडे नोकर राहून आपल्या लोकांचा पराजय करणे ही गोष्ट आह्मी कधींहि करणार नाहीं." आपले लोक परक्याचे गुलाम होतील पण दोघांत कलह लागला असतां दोघे थोडे थोडें नुकसान सोसून एकंदर देशाच्या हिताकरितां झटणार नाहींत. पूर्वीपासून परकी लोक आपल्या देशावर राज्य करितात याचें कारण हेंच होय.
 ज्या कुटुंबांतील माणसांमध्ये एक विचार नाहीं, तीं कधींहि ऊर्जित दशेस यावयाचीं नाहींत त्याप्रमाणेंच देशाची गोष्ट आहे. ज्या देशांतील लोकांचें कोणत्याहि कामांत एक मत नाहीं, तो देश कधीं सुधारणार नाहीं. सुकाणू धरणारा आणि वल्हें मारणारा या दोघांनीं मिलाफानें काम केलें, तरच नाव नीट चालेल, नाहीं तर भलतीकडेच जाऊन आदळेल. तसेंच देशाचें आहे. देशांत कितीएक मोठे असतात व कितीएक गरीब असतात. पण सर्वांनीं देशाच्या कल्याणाकरितां एकमतानें झटलें पाहिजे तरच देशाची सुधारणा होईल.
 सांप्रत देशांतील लोकांचें ऐकमत्य होण्यास अनेक कारणें आ- हेत. त्यांपैकीं चांगलीं वर्तमानपत्रे हें एक होय असें म्हटलें तरी चा- लेल. आपल्या देशांत वर्तमानपत्रे सुरू झाल्यापासून सुधारणेस पुष्कळ मदत होत आहे. हल्लीं प्रत्येक मनुष्यास लोकांचें मत काय आहे हें कळतें. कोणतें काम काढलें असतां आपल्यास