पान:गद्यरत्नमाला.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
गद्यरत्नमाला.


ती मजुरी देऊन त्यांपासून पाहिजे तें काम करून घेतात. सुधा- रलेल्या देशांत इच्छेप्रमाणे मजुरी मागण्यास मजुरांस मोकळीक असते. यामुळें मजूरलोक सुखी असतात.
 रानटी देशांतील लोक बळकट व धैर्यवान असतात, पण त्यां- च्यांत जमाव नसल्यामुळे त्यांत समुदायाने होणारे कोणतेंहि मोठें काम करतां येत नाहीं. सुधारलेल्या देशांतील लोक पाहिजे तेवढीं मोठालीं कामें करतात. रानटी लोकांत जो तो आपणास मुखत्यार समजतो. सुधारलेल्या देशांत पुष्कळ लोक जमून मोठालीं कामें करतात, तसे रानटी लोकांत होत नाहीं. ज्यांपासून शेंकडों वर्षांन नफा मिळणार, असे व्यापार करण्यास हजारों मनुष्यांचा जमाव पाहिजे. . इंग्लिश लोकांच्या व्यापारी मंडळ्यांनी आपल्या देशांत आगगाडीचे रस्ते बांधिले आहेत, हेंच केवढे मोठें उदाहरण आहे ? पहा, हजारों मनुष्ये कंपनीच्या कारखान्यांत वेगळाल्या अधिका- रावर आहेत. त्यांचे मुख्य कारखाने इंग्लंडांत आहेत. तथापि तेथें काम कसें सुरळीत चालतें ! सर्व लोक कंपनीच्या हिताकरितां मनापासून झटतात. आपणापेक्षां ज्याचा अधिकार मोठा आहे, त्यानें कशीहि आज्ञा केली तरी आपली इच्छा एकीकडे ठेवून ते लोक ती पाळतात. आपल्या लोकांमध्ये अशी गोष्ट होईल काय? कदाचित् पांच पन्नास लोक एके ठिकाणीं कांहीं काम करण्यास जमले तर सर्वांचीं मतें वेगळाली पडून कांहींएक नि- काल न होता, सर्व उठून चालते होतील, अशी स्थिति फ्रेंच लोकांत असती तर, त्यांच्यानें सुएज संयोगीभूमि खणून कालवा करवला असता काय ? अमेरिकेतील लोकांत ऐक्य नसतें तर एवढें अफाट लोकसत्ताक राज्य कसें चालतें ? प्लासीच्या लढा- ईत थोड्याशा इंग्लिश लोकांनीं सुराजउद्दवला ह्याच्या प्रचंड सैन्याचे निर्दलन केलें, याचें कारण काय ? पुण्यास एल्फिन्स्टन साहेबाच्या थोड्याशा लोकांनीं बाजीरावाच्या सैन्यास कसें पळ- विलें ? ह्याचें कारण हेंच होय कीं, इंग्लिश लोक सुधारलेले होत.