पान:गद्यरत्नमाला.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सुधारणा.

४५


तील लांबलांबच्या लोकांचें परस्परांशीं दळणवळण नसतें. मो- ठाली शहरें तर मुळींच नसतात. व्यापार अथवा विद्या हीं मुळींच नसतात, अर्थात् त्यांत स्वदेशप्रीतीची कल्पनाही नसते. आफ्रिका खंडांतील पुष्कळ देश, अमेरिका खंडांतील मूळच्या लो- कांचे देश हे रानटी होत. ज्या देशांत बसाहात पुष्कळ, मो- ठाली शहरें, व्यापारी लोक पुष्कळ, संपत्ति व कलाकौशल्य फार, विद्वान् लोक बहुत, लोक स्वदेशाभिमानी, असे देश सु- धारलेले होत. जसे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे यूरोपखं- डांतील देश; व अमेरिकाखंडांतील स्वतंत्र संस्थानें (युनैतेदस्तेत्स् ) हे देश पूर्ण सुधारलेले आहेत.
 मनुष्यांस जशा बाल्य, तारुण्य व वार्धक्य, ह्या अवस्था आ- हेत, तशाच देशाच्या सुधारणेंत दृष्टीस पडतात. इंलंद वगैरे कितीएक देश जे पूर्वी अगदीं रानटी स्थितींत होते, ते हल्लीं सुधारणेच्या शिखरास पोहोंचले आहेत. मिसर, ग्रीस वगैरे जे देश प्राचीनकाळ सुधारणेच्या शिखरास पोहोंचले होते, ते सां- प्रत इतक्या नीच स्थितींत आहेत कीं, ते पूर्वी सुधारलेले होते, असे देखील कोणास वाटणार नाहीं. आशियाखंडांत हिंदुस्थान व चीन हे देश प्राचनिकाळापासून फार सुधारलेले आहेत. हल्लीं यूरोपांतील देशांनीं यांस मागें टाकिलें आहे, यांत संशय नाहीं. तथापि हैं वरील नियमास कांहीं से अपवादक म्हटलें तरी चालेल. कारण, हे देश अमुक वेळी सुधारले असें इतिहासकर्त्यास मुद्धां ठरवितां येत नाहीं. इतक्या प्राचीनकाळापासून सुधारलेले अ- सून अद्याप ते सुधारलेले या विशेषणास पात्र होतात. कलाकौ शल्य व विद्या यांचा हिंदुस्थानांत प्राचीनकाळापासून फैलाव फार झाला आहे. या देशांत जुनीं शहरें पुष्कळ आहेत. शिवाय मुसलमानांनी किती मोडलीं असतील याचा तर ठिकाणच नाहीं. चिनी लोकांचें कौशल्य इतकें पूर्णतेस आले आहे कीं, कित्येक कामांत यूरोपियन लोकांच्यानें सुद्धां त्यांस मागें सारवत नाहीं.