एकादें घड्याळ वगैरे बिघडलेले यंत्र नीट झालें, म्हणजे त्यास सुधारलें अथवा सुधरलें असें आपण म्हणतों, तसेंच एकादा मनुष्य व्यसनाने वगैरे बिघडलेला असून, मूलस्थितीस आला म्हणजे तो आतां सुधारला असें ह्मणतात. तसेच एकादा देश अडाणी स्थितीत असून त्यांत विद्या, कलाकौशल्य, मनुष्याच्या सुख- साधनांचे पदार्थ पुष्कळ झाले, म्हणजे त्या देशास सुधारलेला देश असें म्हणतात; यावरून असें लक्षांत येईल कीं, प्रत्येक गो- ष्टीस सुधारणा आहे. परंतु हल्लीं, सुधारणा ह्मणून जो शब्द मराठी भाषेत प्रचारांत पडला आहे, तो विशेषेकरून देशाची सुधारणा या अर्थाने बहुशः सर्व लोक समजतात.
वरील लिहिण्यावरून देशाची सुधारणा म्हणजे काय ? असा प्रश्न सहज उत्पन्न होतो. त्याविषयीं थोडासा विचार करणें आवश्यक आहे.
ज्या देशांत विद्येचा प्रसार पुष्कळ झाला आहे, ज्यांत मनु- घ्याच्या सुखाचीं साधनें पुष्कळ वाढली आहेत, ज्यांतील लोक विद्वान् असून आपले व दुसऱ्याचे हक्क समजतात व पाळतात, ज्या देशांत राज्यव्यवस्था चांगली असून, गरीब व श्रीमान् यांस न्यायाचें रक्षण सारखे मिळते, ज्यांतील पुष्कळ लोक एकमतानें वागून मोठाले व्यापार करतात आणि देशांतील संपत्ति वाढवि तात अशा देशास सुधारलेला देश असें म्हणतात. ज्या दे- शांत वरील गोष्टी नाहींत, त्यास रानटी देश असें म्हणतात. सुधारलेल्या देशांतील सर्वच मनुष्यें चांगलीं असतात आणि रा- नटी देशांतील सर्व वाईट असतात असें नाहीं. परंतु सुधार- लेल्या देशांत वर सांगितलेले गुण एकंदरींत पुष्कळांच्या अंगीं व रानटी देशांत त्यांच्या विरुद्ध दोष पुष्कळांच्या अंगीं, असें समजावयाचें. रानटी देशांतील लोक लहान लहान टोळ्या करून लांब लांब राहतात. कित्येक नेहमीं प्रवासच करीत फिरतात. कदाचित् लहान सहान खेडी असली तरी, देशां-