पान:गद्यरत्नमाला.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
गद्यरत्नमाला.


होकायंत्र व बंदुकीची दारू ही चिनी लोकांस पूर्वीपासून माहीत आहेत. चिनी लोक स्वदेशाभिमानी आहेत, पण ते इतर देशाशीं संबंध ठेवीत नाहींत, व त्यांच्यामध्ये विद्यावृद्धि नाहीं, झणून ते पूर्वी सून आहेत तसेच आहेत. त्यांची सुधारणा वाढत नाहीं. हिंदुलोकांत विद्या व कलाकौशल्य या दोहोंचा प्रसार होता; तथापि त्यांमध्ये ऐक्य व स्वदेशप्रीति हीं नाहींत; ह्मणून त्यांची सुधारणा चिनी लोकांप्रमाणें स्थायिक न राहतां दिवसेंदिवस नष्ठ होऊं लागली. तथापि आशियाखंडांतील सर्व देशांपेक्षां हा देश अधिक सुधारलेला आहे. यूरोपांतील प्राचीन व अर्वाचीन सर्व सुधारलेल्या लोकांस विद्या, कला, वगैरे सुधारणेचीं साधनें हिंदु- लोकांपासून प्राप्त झालीं, असें कित्येक जर्मन देशांतील अर्वा- चीन विद्वानांचें मत आहे.
 रानटी देशांतील लोकांत श्रमविभाग नाहीं. प्रत्येक मनुष्यास आपल्या निर्वाहाचे सर्व पदार्थ मिळविण्यास श्रम करावे लागतात. पुष्कळ मनुष्यें एकत्र जमून कोणतेंच काम करीत नाहींत, त्या- मुळें त्यांची सुधारणा होत नाहीं. देशाची सुधारणा होण्यास श्र विभाग हैं मुख्य कारण होय. श्रमविभाग म्हणजे, मनुष्यांनी जुटीनें राहून प्रत्येकाने स्वतःच्या निर्वाहाची सर्व कामे न करतां सर्वोच्या निर्वाहाचें एकेक काम केलें पाहिजे. असें झालें म्हणजे सर्वोच्या श्रमांचें फल प्रत्येकास प्राप्त होतें. ह्मणून प्रत्येक सुखी होतो. रानटी देशांत तसें होत नाहीं, ह्मणून सर्व दुःखी होतात. रानटी देशांत कायदा अथवा न्याय मुळींच नसतो. ' बळी तो कान पिळी' या झणीचा येथें पूर्ण अम्मल असतो.तेथें

सत्ता हाणून कांहीं पदार्थ नाहीं. कुरणांत गुरे चरण्यास सोडिली म्हणजे बळकट असेल तें इतरांस दूर करून आपण पाहिजे त्या ठिकाणीं चरू लागतें, तसें रानटी देशांत ज्याच्या अंगी बळ तो सर्वोवर अंमल करतो.

 सुधारलेल्या देशांत प्रत्येक मनुष्याची आपल्या शरीरावर व