पान:गद्यरत्नमाला.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
गद्यरत्नमाला.


काम आहे. घोटाळ्याचे खटले असतील त्या वेळेस न्यायाधी- शानें कायद्याचा अर्थ फार जपून केला पाहिजे. कायद्याप्रमाणें शारीरदंड करण्याचा प्रसंग आल्यास, तो बेताबाहेर जाऊं न दे- ण्याविषयीं न्यायाधीशानें जपले पाहिजे. देहांत शिक्षा देण्याचे खटले न्यायाधीशानें मोट्या काळजीनें व किंचित् दयार्द्र अंत:- करणाने तपासले पाहिजेत. कायदे स्वरूपतः चांगले असून, काल, देश, वर्तमान यांस विपरीत असतील तर आवश्यक फेर- फार करण्याविषयीं कायदे करणान्यांस सुचविणें न्यायाधीशाचें काम आहे. पक्षकारांचीं बोलणीं न्यायाधीशानें शांतपणे ऐ- किली पाहिजेत. पक्षकारांचें बोलणें संपण्यापूर्वी, एकाद्या गोष्टी- विषय न्यायाधीशाने आपले मत स्थापित करूं नये. पुरावा पुष्कळ असला तरी, ऐकण्यास न्यायाधीशानें कंटाळा करूं नये. आमचा पुरावा ऐकिला नाहीं, असें झणण्याचा प्रसंग कधींहि येऊ देऊ नये. उभयपक्षांचे बोलणे ऐकून, त्यांतील मुद्दे धरून न्यायाधी- शानें न्याय करावा. न्यायाधीशाने केलेले निवाडे प्रसिद्ध झाले पाहिजेत. त्यांवर टीका करण्यास लोकांस अधिकार असावा. आपल्या हाताखालचे लोक, भय दाखवून पक्षकारांपासून पैसा वगैरे घेतात किंवा काय याकडे न्यायाधीशानें कडक नजर ठेविली पाहिजे.
 केवळ कायद्यांच्या आधाराकडे लक्ष देऊन न्याय करणें नेहमीं चालत नाहीं. लोकांच्या रीतिभातींचा विचार केला पाहिजे. गुन्ह्याचा तपास करतेवेळीं कोणत्या स्थितीत असतां गुन्हेगाराने गुन्हा केला याचा विचार केला पाहिजे. देशांत व्यवहार वाढला म्हणजे कायदे बदलतात. आपल्या देशांत पूर्वी धर्मशास्त्राप्रमाणें न्याय होत असे, पण आतां तसें चालत नाहीं. इंग्लिश लोकांचें राज्य झाल्यापासून देशस्थिति अगदीं बदलत चालली आहे. मनु वगैरे यांचे कायदे सर्वोर्शी सरकारानें रद्द केले नाहींत ; तथापि ए- कंदर कायद्याचं स्वरूप अगदी भिन्न झाले आहे. प्रजेस खरा न्याय मिळावा, ह्मणून सरकारानें पुष्कळ तजविजी योजिल्या पाहिजेत.