पान:गद्यरत्नमाला.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
न्यायाधीश आणि वकील.

४१.


पुराव्यावरून जी गोष्ट सिद्ध होते, ती लिहिलेल्या कायद्याप्रमाणें अथवा सर्वानुमतें देशांत स्थापित झालेल्या संप्रदायाप्रमाणे आहे किंवा नाहीं, हें सांगणें त्याचें काम आहे. अमुक गोष्ट अमुक प्रकारची असावी, असें म्हणण्यास त्यास अधिकार नाहीं.
 केवळ कायद्याचें ज्ञान चांगले असले तरी न्यायाधीश चांगला होत नाहीं. तो जात्या विद्वान् असून लोकव्यवहार जाणणारा असला पाहिजे. न्यायाधीशाचा स्वभाव गंभीर व शांत पाहिजे. न्यायाधीश थट्टेबाज असला तर त्याचें वजन पडत नाहीं. तो उतावीळ असला, तर लोकांचे नुकसान होतें. मला वाटेल तेंच योग्य असा भरवसा धरून न्यायाधीशानें चालूं नये. पक्षकारांची बोलणी ऐकून व कायद्यांतील प्रमाणे पाहून त्यानें न्याय करावा. न्यायाधीशाच्या सर्व गुणांमध्ये प्रामाणिकपणा हा मुख्य गुण होय. कायद्याच्या गैरसमजानें वगैरे न्यायाधीशाच्या हातून चूक झाली तर, एकंदर लोकांचें विशेष नुकसान नाहीं; परंतु तो प्रा- माणिक नसला तर लोकांच्या शरीराचे व मालमत्तेचें संरक्षण हो- णार नाहीं. अज्ञानतः एकाद्याच्या हातानें वाईट गोष्ट घडली, तर तो विशेष दंड्य नाहीं. पण समजून उमजून वाईट गोष्ट करणारा अथवा करावी हाणणारा यांस मोठी शिक्षा पाहिजे.
 न्यायाधीश न्यायी असला तरी, खरा न्याय होण्यास पुष्कळ अडचणी असतात. पक्षकारांशीं, किंवा त्यांच्या वकिलांशीं न्या- याधीशाच्या नात्याचा वगैरे संबंध असतो.अशा कधीं कधीं एकाद्या पक्षकाराचा न्यायाधीशाच्या वरिष्ठांशी संबंध असतो. ठिकाणी न्यायाधीश धैर्यवान् असला तरच खरा न्याय होतो.
 अमुक मनुष्यानें अन्याय केला, ह्मणून त्याचा सूड उगविणें हा न्यायाचा अथवा कायद्याचा उद्देश नाहीं.एकास अपरा- घाबद्दल शिक्षा झाली,हें पाहून इतरांनी तसें करूं नये, हाच शिक्षा देण्याचा मूळ उद्देश होय. अपराध्यांस शिक्षा करण्या- पेक्षां, अपराध कमी होण्याची तजवीज करणें हें कायद्याचें मुख्य