पान:गद्यरत्नमाला.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उच्चस्थिति.

३९


तितके आपण सुखी आहों असें ते मानणार नाहींत.गरीब मनुष्याकडून चूक झाली तर लोक त्याचे पदरांत ती लागलीच घालितात, त्यामुळे तो ती सुधारितो. पण श्रीमंतांचे तसें नाहीं. सर्वांस त्यांची चूक कळली असली तरी त्यांस वाईट वाटेल म्ह- णून ते ती त्यांस सांगत नाहींत, त्यामुळे ती त्यांकडून पुनः पुनः होते. तसेंच गरीबांचं दुःख सर्वांस कळतें, म्हणून त्यांस सां• त्वन करणारा कोणी तरी मिळतोच. पण श्रीमंतांचें तसें नाहीं. आपणांस दुःख आहे, असें लोकांस कळलें असतां आपला मान कमी होईल, असें समजून श्रीमंत लोक दुःख कोणास सांगत नाहींत. यामुळे सर्व दुःखाचा भार स्वतः सोसावा लागतो.
 परहित करण्याकरितां, कित्येक लोक उंच स्थितीची इच्छा करितात. खरोखर पाहिलें तर सर्व स्थितींत परहित करण्याची स्वड सारखीच असते. पण जसजशीं मनुष्यास उंच स्थिति प्राप्त होईल, तसतशी त्याची दुसन्याचें वाईट करण्याची शक्ति वाढते. त्याप्रमाणें त्यानें केले म्हणजे अर्थातच परहित, त्या मानानें त्याचे हातून कमी होतें. यास उदाहरण न्यायाधीशाचें घेऊ. न्यायाधीशाच्या जाग्यावर कोणी मनुष्य असला, तर तो न्याय करील तसा आपण करूं. आपणांस ती जागा मिळाली म्हणजे न्याय अधिक होईल असें नाहीं. ज्या कामाकरितां आप णांस सरकारांतून पगार मिळतो, तें काम आपण न्याय्य रीतीनें बजाविलें तर त्यांत दुसऱ्याचें बरें केलें असें कोणी म्हणणार नाहीं, तेव्हां अर्थातच बरें करण्याची शक्ति वाढली, असें म्हणतां येत नाहीं. अधिकारी आपल्या अधिकाराच्या जोरानें पक्षपात करून आपल्या एकाद्या मित्राचें हित किंवा शत्रूचें अहित करलि, परंतु तें त्यास तितक्या मानानें दुसऱ्याचें अहित किंवा हित केल्याशि- वाय कधींहि करितां येणार नाहीं. न्यायाधीशास लाच खाऊन लोकांपासून पैसा उपटण्याची सवड असते, तसे लोकांचे चांगलें करण्याचे त्याच्या हातांत कांहीं नाहीं म्हटलें तरी चालेल. चोरी