पान:गद्यरत्नमाला.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८
गद्यरत्नमाला.


च्चस्थितीत अनेक संकटे असून, तींत मनुष्य अगदी पराधीन होतो.
 स्वतंत्रता सोडून परतंत्रतेची इच्छा करणें ही विलक्षण इच्छा आहे. दुसऱ्यांवर अम्मल करण्याच्या आशेनें लोक पराधीन हो- तात, हें केवढे आश्चर्य आहे ! मनुष्यांस श्रम आवडत नाहींत, परंतु श्रम करून जींत अधिक श्रम आहेत, अशी स्थिति ते आपणास प्राप्त करून घेतात. मनुष्यांस सन्मान आवडतो; म्ह- णून तो मिळविण्याकरितां ते अपमान सोसून घेतात. ' चढेल तो पडेल, ' ह्या म्हणीप्रमाणे मोठ्या मनुष्यास हलकी स्थिति ये- ण्याचें भय असतें, व ती आली म्हणजे, पहिल्यापासून हलक्या स्थितींत असलेल्या मनुष्यापेक्षां याचे शरीरास व मनास अधिक दुःख होतें. श्रीमंतींत असतांना चांगले पदार्थ खाऊन व उंची वस्त्रे पांघरून जें शरीर सुखावलेलें असतें, त्यास अन्न व वस्त्र या दोहोंचीहि दधात पडली म्हणजे काय अवस्था होत असेल हें सांगावयास नको. जो नेहमीं जन्मापासून परांच्या गादीवर निजणारा व उंची आंबेमोहर तांदूळ खाणारा त्यास निजावयास घोंगडी, व खावयास राळ्यांचा भात, हीं प्राप्त झाली म्हणजे किती वाईट वाटेल ? तसेंच जे लोक यास मोठेपणांत मान देत होते, किंवा ज्यांस यापासून साहजिक किंवा बुद्धिपुर: सर, उच्च स्थितींत असतां, पीडा झाली असेल, तेच लोक त्याचा उपहास करूं लागले म्हणजे, मनास किती दुःख होईल ?
 श्रीमंतीचें सुख कांहीं अंशीं सौंदर्याच्या सुखासारखे आहे. कारण, अमुक मनुष्य फार सुंदर आहे, असें लोक म्हणतात; किंवा त्यास पाहून आनंदित होतात, म्हणून सुंदर मनुष्य म- नांत सुख मानितो. वस्तुतः पाहिले तर याशिवाय त्यास दुसरें साक्षात् सुख नाहीं. तसेंच ऐश्वर्याच्या मालकांशी लोक हांजी हांजी करितात, आपण मोठे दैववान् आहां असें म्हणतात, म्ह- णून श्रीमंत आपणांस सुखी मानतात. पण खरोखर ते आपल्या मनांत आपल्या सुखाचा विचार करतील, तर लोक समजतात