पान:गद्यरत्नमाला.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
उच्चस्थिति.

३७


ती तृप्त करण्याकरितां, नेहमीं उद्योगी असणें हें योग्यच आहे. पण केवळ द्रव्यसंचयाच्या अथवा विषयसुखाच्या इच्छेनें मोठ्या पदाची इच्छा करणे व ती तृप्त करण्यासाठी हवे ते अन्याय करणे किती वाईट आहे !
 मोठेपण प्राप्त होण्यापूर्वी त्यापासून जें सुख होईल हाणून वाटत असतें, त्याच्या शतांश देखील तें प्रात झाल्यावर अनु- भवास येत नाहीं. गरिबीत मनुष्य पोट भरण्यापुरता एकाचाच चाकर असतो, परंतु श्रीमंताचें तसें नाहीं. तो पुष्कळांचा चा- कर होतो. श्रीमंत मनुष्य राजाचा चाकर आहे. राजाची मर्जी कोणत्या गोष्टीनें फिदा राहील, त्या तजविजी योजण्याच्या काळजीत त्याचें मन दिवसभर घोंटाळत असतें. इतकेंहि करून ज्या उपायांनी आपली कीर्ति लोकांत कमी होणार नाहीं, ते उपाय योजावे लागतात. यासाठीं तो कीर्तीचा चाकर होऊन असतो. एकादें मोठें राजकीय काम त्याजकडे असले म्हणजे हजारों मनुष्यांचीं कामें त्याजकडे येणार. त्यांपैकीं कांहींच्या तरी इच्छेविरुद्ध त्यांच्या कामांचा उलगडा होणार. तेव्हां अर्थातच ते त्याचे शत्रु होणार. तेव्हां अर्थात सर्वांस खुष ठेवून आपले काम न्याय्य रीतीनें बजावण्याविषयीं काळजी वहावी ला- गते, व हैं करणें फार दुर्घट असल्यामुळे रात्रंदिवस मन तिकडे असतें. विशेष काय, पण चाकरांपासून सुद्धां मोठ्या पदवीच्या 'मनुष्यांस भय असतें. त्याच्या पदरीं पुष्कळ मनुष्ये असणार. त्यांत कांहीं चांगली व कांहीं वाईट असावयाचीच. वाईट म नुष्यें बहुशः लबाड असतात. तीं यजमानाच्या तोंडासारखें बोलून, आपण यजमानाचे हित करण्यांत तत्पर आहों असें दा खवीत असतात. ह्यामुळे यजमानास खरी स्थिति कांहींच कळे- नाशी होते, व त्याची अशा मनुष्यांवर प्रीति बसली, म्हणजे खरे इमानी चाकर असतात ते उदासीन होतात. यासाठीं नेहमीं कोण कसा आहे हे मोठ्या मनुष्यांस पाहावें लागतें. अर्शी उ-