पान:गद्यरत्नमाला.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संवय आणि चाल.

३५


शरीर व मन या दोहोंवरहि संवयीचा अंमल चालतो. संवयीनें मनुष्यास चांगले वाईट वाटतें, व वाईट चांगले वाटतें. संवय हा मोठा कायदा आहे; याकरितां देशांत, गांवांत, व घरांत चांगल्या चाली पाडणें हें मनुष्याचे मुख्य कर्तव्य होय. ज्या तं- बाखूचा वास आला असतां वांति होते, तीच तंबाखू एकदां व्य- सन लागल्यावर क्षणभर खावयास मिळाली नाहीं तर चैन पडत नाहीं. चोरांस दुसऱ्याची वस्तु चोरणें वाईट वाटत नाहीं. खा- टकास भराभर जनावरांचे गळे कापण्यास दिक्कत वाटत नाहीं. हे सगळे संवयीचे परिणाम होत.
 स्त्रियांस विद्या शिकविणें वस्तुतः चांगले असून कित्येकांस तें वाईट वाटतें, हा संत्रयीचा परिणाम होय. बॉलाची (ना- चाची ) चाल इंग्लिश लोकांत वाईट आहे; परंतु ती त्यांस सं- वयीनें चांगली वाटते. ढेंकूण पायांखालीं चिरडला असतां ज्यांच्या अंगावर कांटा येतो त्यांस देवतेस प्राण्याचा बली देण्याची चाल वाईट वाटत नाहीं. शरीरदंडाने ईश्वर प्रसन्न होतो, असें कित्येक लोकांस वाटतें, हा एक संवयीचाच प्रकार होय. मागले लोक करीत आले तें आपण करावें असा जगांत बहुशः पुष्कळांचा कल असतो. याकरितां एकादी वाईट चाल मोडून टाकण्याचें अथवा चांगली चाल पाडण्याचे कोणीं मनांत आणलें तर त्यास पुष्कळ लोक अडथळा करतात. जगांत खन्याखो- स्याचा अथवा चांगल्यावाइटाचा विचार करण्याची योग्यता फारच थोड्यांस असते. अंधपरंपरेने चालणारे लोक फार. मुलांस लहानपणापासून चांगली चाल लावणें याचेंच नांव सुशि- क्षितपणा. फक्त पुष्कळ भाषा अथवा शास्त्र शिकून मनुष्य सु- शिक्षित होत नाहीं. मुलांस चांगल्या संवयी लावण्याकरितां आईबापांनी आपले वर्तन चांगलें ठेविलें पाहिजे. मुले बिघढ- ण्याचें मुख्य कारण वाईट चालीच्या मनुष्याची संगति होय. कित्येक आईबाप मुलांश लघळपणा करतात, त्यामुळेंहि मुलें