३३
करितां, देव एकाएकीं त्यांजवर असे प्रसंग आणितो. खरें काय असेल तें असो, पण या मतानें ईश्वराकडे कमीपणा येतो असें दिसतें.
अकस्मात् एकाद्या श्रीमान् मनुष्याची गरिबावर कृपा झाली, अथवा एकाद्या मोठ्या मनुष्याचे मरणानें त्याची संपत्ति कोणास प्राप्त झाली, वगैरे गोष्टी पाहिल्या म्हणजे, आपण त्या मनुष्यासे दैत्रवान् म्हणतों. परंतु वास्तविक पाहिले तर दैव चांगलें अथवा वाईट करणें बहुशः उद्योगाच्या हातीं आहे असें दिसतें. जसा उद्योग करावा, तसें फल प्राप्त होतें. दैव केवळ पंगु आहे, तें उद्योगाशिवाय उदयास येत नाहीं. उद्योग न करितां दैवावर भरंवसा ठेवणें मूर्खपणाचें काम होय. कधीं कधीं एकाचें मूर्खपण अथवा आळस हें दुसऱ्याचें सुदैव होतें. कारण एकाद्यास एकाएकीं विपुल संपत्ति मिळते ती एकदम आका - शांतून धार पडून मिळत नाहीं; परंतु भोंवतालच्या मनुष्यांपेक्षां अंगीं उद्योग व शहाणपण हीं जास्त असल्यामुळे इतरांपेक्षां याची भरभराट होते. लोकांशी गोडीगुलाबीनें वागलें म्हणजे तेस्तुति करितात; पण भरभराट होण्याचे गुण वेगळेच आहेत. नीति न सोडतां प्रसंग पडेल तसें वागण्याचें चातुर्य, नम्रता, आ- जैव, सतत उद्योग, इत्यादि सुखप्रातीचीं साधनें अनेक आहेत. ज्यास आपली स्थिति चांगली करून दैववान् ह्मणवून घ्यावयाचें असेल त्यास आपल्या बोलण्याचालण्यांत वगैरे सर्व लहानसहान गोष्टींत दक्षता ठेविली पाहिजे. उद्योग दैवाचा उत्पादक व रक्षक आहे. अगदीं नीच स्थितींत असून उद्योगानें महत्त्वास आलेल्या पुरुषांची पुष्कळ उदाहरणें दाखवितां येतील. बा- ळाजी विश्वनाथ पेशवा यःकश्चित् कोंकणचा ब्राह्मण होता; पण उद्योगानें त्यानें आपल्या वंशास पेशवाई मिळविली. बेंजामिन् फ्रांक्लिन एका गरीब मनुष्याचा मुलगा होता, परंतु उद्योगानें वाढत वाढत मोठा श्रीमान् व कीर्तिमान् झाला.