पान:गद्यरत्नमाला.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
गद्यरत्नमाला.


यांची पहिल्यानें पुष्कळ निंदा झाली; परंतु त्यांनी झटून आपलें बोलणें खरें करून दाखविलें म्हणून आतां त्यांची अक्षय कीर्ति गाजत आहे. देशाची सुधारणा करूं इच्छिणाऱ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षांत ठेविली पाहिजे. क्षणिक निंदेस भिऊन अक्षय कीर्तीचा लाभ सोडणें हें मर्दाचं काम नव्हे. तसेंच राजादिकांपा- सून मान मिळाल्यामुळें लबाड लोकांच्या क्षणिक स्तुतीस भुलून असत्पक्षाचें मंडन करणें हाहि मोठाच नीचपणा होय, हैंहि विसरूं नये.

दैव आणि उद्योग.


 सर्व लोक दैव आहे असें मानितात. दैव ह्मणून कांहीं भाव- रूपी वस्तु आहे किंवा नाहीं, हें सिद्ध करण्याचे कठीण आहे, तथापि त्याच्या अस्तित्वाची कोणास शंका येत नाहीं. कार्याव- रून कारणाचें अनुमान करण्याचा मनुष्याचा स्वभाव आहे म नुष्य आपल्या सत्कर्मानें व उद्योगानें सुखी होतो; दुष्कर्मानें व आळसानें दुःखी होतो, हें आपण नेहमी पाहतों. परंतु एकाद्या ठिकाणी याच्या उलट दृष्टीस पडलें म्हणजे आपण तेथें दैव असें हाणतों. आपण असें मानतों कीं, पूर्वजन्मीं मनुष्य जें पापपुण्य करितो, त्याचें फळ त्या जन्मीं भोगिलें नसल्यास या जन्मीं भो- गावें लागतें. याकरितां, जगांत कित्येकांस आचरणाविरुद्ध फल- प्राप्ति होते. कित्येक साधूंच्या हातून दुष्कृत्य झालें नसतें तथापि त्यांस दुःख होते. तसेंच कित्येक दुष्टांच्या हातून सत्कृत्य कधीही घडत नाहीं, पण ते सुखीच असतात. याचें कारण त्यांचें जन्मांतरीय पापपुण्य होय, असें शास्त्राचें मत आहे. यावरून आपण पूर्वजन्मीं संचित पापपुण्यासच दैव असें म्हणतों. कित्येक धर्मातील लोक मनुष्यास पूर्वजन्म असतें, असें मानीत नाहींत. जगांत आचरणाविरुद्ध सुखदुःखे प्राप्त होतात, त्याचें कारण ते असें सांगतात कीं, मनुष्यांच्या अंतःकरणाची परीक्षा पाहण्या-