पान:गद्यरत्नमाला.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्तुति आणि निंदा.


३१

शहाणपणानें राज्य चालवून शत्रूंवर दरारा ठेवणाऱ्या प्रधानाची लोकांत स्तुति कमी होते. वक्तृत्वानें व इतर अनेक कुलुंगडी करून खऱ्याचें खोटें व खोट्याचें खरें करणाऱ्या वकिलांची लो- कांत प्रतिष्ठा होते; तशी न्यायाने चाळणाऱ्या माणसांची होत नाहीं. गुन्हे न करण्यापेक्षां गुन्हे करून जे सांपडत नाहींत, त्यांस लोक हुशार म्हणतात. इष्टमित्रांचे हित कैरितो त्याची जशी चौघांत वाहवा होते, तशी देशकल्याणाकरितां झटणारांची होत नाहीं. काव्यालंकार शिकलेल्या व्युत्पन्नाची प्रतिष्ठा, न्याय, मीमांसा शिकलेल्या विद्वानांपेक्षां साधारण लोकांत अधिक असते. महा- लकरी, मामलेदार, वगैरे यःकश्चित् सरकारी कामदारांस लोक रावसाहेब म्हणून मोठा मान देतात; परंतु मुलांस शिकविणाऱ्या गुरूचें नांव निघालें म्हणजे अ: पंतोजीचना ? असें म्हणतात. यावरून असें दिसतें कीं, साधारण लोकांच्या स्तुतकिडे अथवा निंदेकडे लक्ष देऊ नये. खरे विद्वान् लोक ज्यास चांगलें म्हण- तील तें करावें; व वाईट म्हणतील तें वर्जावें. हजारों अडाणी लोकांपासून चांगले म्हणून घेण्यापेक्षां दहा पांच शहाण्या लो- कांनी चांगले म्हणावे यांतच भूषण आहे.

 लोकांच्या निंदेस न भिऊन मनुष्यानें स्वहिताकरितां कोणतेंही वाईट कृत्य करूं नये. परंतु जेथें हट्टानें व मूर्खपणानें लोक निंदा करितील, तेथें निंदेकडे लक्ष न देतां खरेपणानें वागावें हेंच योग्य होय. नवीन कल्पना काढणाऱ्यांनीं व नवी चांगली रीति स्थापन करणाऱ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षांत ठेविली पाहिजे. जोपर्यंत त्यांच्या कल्पनेच्या खरेपणाविषयी लोकांची खात्री झाली नाहीं तोपर्यंत त्यांची निंदा व्हावयाचीच. अशा प्रसंगों निंदेस मागे सारू- न धैर्यानें पुढे सरसावलें पाहिजे. गालिलिओ, कोलंबस, लूथन


  • १६ व्या शतकांत इताली देशांत मोठा ज्योतिषशास्त्रवेत्ता होऊन गेला. ख्रिस्ती धर्माच्या प्रातेस्तंत मताचा स्थापनकर्ता.