पान:गद्यरत्नमाला.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०


गद्यरत्नमाला.


कठीण आहे! केवढा मोठा राजा असला तरी, तो नेहमीं धा- कांत असतो. विशेष काय, कित्येकांस स्वस्थ झोपसुद्धां येत नाहीं. 'गरीब लोक आपल्या लहानशा झोंपडीत सुखानें झोंप घेतात; ते आम्हांपेक्षां किती सुखी आहेत ? ' असें पुष्कळ रा- जांच्या मुखांतून निघाले आहे. यावरून असें सिद्ध होतें कीं राज्यसुख जेवढे मोठें आहे, म्हणून इतरांस वाटतें त्याच्या शतां- शाचासुद्धां राजास अनुभव नाहीं.

स्तुति आणि निंदा.


 स्तुति सर्वास आवडते. स्तुति न आवडणारा मनुष्य जगांत एकसुद्धां सांपडणे कठीण. स्तुति आवडणे हा सर्वांशीं दोषच आहे असें नाहीं. अंशतः हा गुणच आहे, म्हटलें तरी चालेल. कारण, आपणांस लोकांनीं चांगलें म्हणावें म्हणून बहुतेक लोकांची सगुणाकडे प्रवृत्ति होते. तथापि लोकांनीं स्तुति करावी, एवढ्या करितांच चांगल्या कृत्याकडे तत्परता नसावी; असे असले तर स्तुतिप्रिय मनुष्य लोकांनीं चांगलें म्हणावें म्हणून वाईट कृत्यें करील. जगांत लोक चांगल्यास चांगले व वाईटास वाईट म्हण- तात. असा नियम नाहीं. म्हणून जें कृत्य चांगले आहे, त्यास अज्ञान लोकांनी वाईट म्हटलें तरी, तें करण्यास शाहाण्यानें मागें हदूं नये. तसेच एकादी वाईट गोष्ट दहा वीस अज्ञान लोकांनी चांगली म्हटली म्हणून ती करूं नये. निंदेस न भिणारे जगांत पुष्कळ आहेत, तरी ती कोणास आवडत नाहीं, हें खचित आहे. कधीं कधीं लोक उगाच निंदा करितात तरी साधारणपणे लोकनिं- देस भिऊन चालणें चांगलें.
 सद्गण आणि स्तुति ही बहुशः उलट प्रमाणानें रहातात. ह- लक्या प्रतीच्या सद्गुणांची लोकांत स्तुति फार होते. एकंदर लो- कसंख्येत अडाणी लोक फार, त्यांस मोठ्या सद्गुणाची योग्यता कळत नाहीं. लढाईत शत्रूंचा पराभव करणान्या वीरांपेक्षां