पान:गद्यरत्नमाला.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राज्यसुख.

२९


राज्यसुख.


 मृत्युलोकीं सर्वात मोठें सुख म्हणजे राज्यसुख होय, असें लोक समजतात. मनुष्याचा स्वभाव असा कांहीं चमत्कारिक आहे कीं, शहाणपण नसल्यास त्यास कोणत्याच स्थितींत सुख व्हावयाचें नाहीं. फार दारिद्र्य असले म्हणजे जसा मनुष्य घों. टाळून जातो त्याचप्रमाणें ज्या मनुष्यास सर्व गोष्टी अनुकूल आ- हेत, कोणत्याही गोष्टीची गरज राहिली नाहीं, तो मनुष्यहि अगदी कामांतून जातो. या गोष्टीस पुष्कळ राजांची उदाहरणें आहेत. स्वदेशाचें राज्य निष्कंटक प्राप्त झाले म्हणजे राजास वास्तविक कोणतीहि दधात नसते. पण दुसरा कांहीं उद्योग नसल्यामुळें, परदेशावर स्वाच्या कराव्या, असें पुष्कळ राजांस वाटतें. अंगांत पराक्रम नसला म्हणजे परदेशावर स्वान्या होत नाहींत, तेव्हां भलभलत्या दुष्कृत्यांत राजेलोक काळ घालवितात; यास उदाहरण, महमद तवलख, धाकटा बाजीराव, यांसारखे आजपर्यंत पुष्कळ राजे झाले. राज्य मिळाले तरी तें संभाळ- ण्याचें काम फार कठीण आहे. बायका, मुलगे, आप्त, प्रधान, प्रजा, शत्रु, या सर्वांपासून राजास फार भय असतें. इंग्लंदचा राजा दुसरा एडवर्ड याचा वध होण्यास त्याची राणी कारण झाली. दिल्लीचा बादशहा शहाजहान व इंग्लंदचा राजन दुसरा हेनरी यांस त्यांच्या पुत्रांनी पदच्युत केलें. आपल्या पु- त्रास गादी प्राप्त व्हावी म्हणून आनंदीबाईनें नारायणराव पेश- व्यास ठार मारविलें. इंग्लंदचा राजा पहिला चार्लस याचा लोकांनी शिरच्छेद केला. फ्रान्स देशाचा बादशाहा नेपोलिअन यास शत्रूंनीं धुळीस मिळविले. अशी उदाहरणे इतिहासांत शेकडों सांपडतील.
 लहानशा कुटुंबांतील मनुष्यांवर दाब बसवून संसार सुरळीत- पणें करण्याचेंच बहुतेकांस कठीण पडतें, मग वर सांगितलेल्या सर्वोवर दाब बसवून सुरक्षितपणे राज्यकारभार चालविणे किती