पान:गद्यरत्नमाला.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आरोग्य.

२५


यांत संशय नाहीं. फ्रान्स देशाच्या आधिपत्यानें तृप्त असून नेपोलिअन यानें देशसुधारणेकडे ही बुद्धि लाविली असती तर फ्रान्स देशाची आज किती उत्तम स्थिति असती ! नेपोलिअन या नांवास किती मान मिळाला असता ! नेपोलिअन याची बुद्धि इतकी चांगली होती कीं, त्याने जे कायदे केले आहेत ते अद्याप फ्रेंच लोकांस फार आवडतात. नेपोलिअन स्वभावानें व सद्गुणांनी चांगला होता, पण दुष्ट महत्त्वाकांक्षेमुळे त्याच्या सर्व चांगुलपणा- वर पाणी पडलें.

आरोग्य.


 शरीरप्रकृति चांगली राखण्यास प्रत्येक मनुष्याने जपलें पाहिजे. ज्यास आरोग्य नाहीं, त्याच्याने स्वहित किंवा परहित कांहीं व्हावयाचें नाहीं. तो कितीही बुद्धिमान् असला तरी त्यास विद्या व्हावयाची नाहीं. सुखोपभोगाची साधने असली तरी, त्यास सुख व्हावयाचें नाहीं. सर्व संपत्तीमध्ये शरीरसंपत्ति मोठी होय. प्रकृति निरोगी राहण्यास वैद्य नेहमीं जवळ बाळगिले पाहिजेत, अथवा रसायनें व मात्रा यांचा संग्रह केला पाहिजे असें नाहीं. आपल्या प्रकृतीस काय मानवतें, व काय बाधतें, हें बहुशः सर्वांस समजते. जे पदार्थ आपल्या प्रकृतीस मानतील त्यांचेच सेवन करावें. एकादा पदार्थ आवडत असून प्रकृतीस मानत नसेल तर त्याचा त्याग करावा. बाळपणीं आपण धिटाईनें वागतों, . तसें मोठेपणी वागले तर बाधक होईल. आरोग्य राहण्याकरितां खाण्यापिण्याचा बेत नेहमीं ठेविला पाहिजे. मुलांस समजत न- सतें तेव्हां आईबापांनी त्यांस नियमित राखण्याविषयीं तजवीज ठे- वावी. समजूं लागल्यावर ज्याचें त्यानें स्वतां जपले पाहिजे, कधीं न पाहिलेला पदार्थ आपणांस मिळाला तर त्याचें फार सेवन करूं नये. झोंपेचा बेत राखिला पाहिजे. दिवसास कधींहि निजूं नये व रात्रीस फार जागूं नये. दिवसास निद्रा व रात्रीस जागरण