पान:गद्यरत्नमाला.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
गद्यरत्नमाला.


खंड जिंकण्याचा निश्चय केला. याच्या हाताखाली लाख फौज नेहमी असे, असें ह्मणतात. लढाईच्या कामांत हा फारच चतुर होता. यूरोपांतील लोक याच्या नांवाससुद्धां भिऊं लागले होते. यानें थोड्या श्रमानें नेपल्स, हॉलंद, वेस्तफालिया, एथील राज्य जिंकून तितके ठिकाणी आपले भाऊ गादीवर बसविले. शेवटीं स्पेन देशच्या राजास पदच्युत करून तें राज्यहि त्यानें आपल्या भावास दिलें ! एवढ्यानें तृप्त न होऊन त्यानें रशिया देशावर मोठी फौज घेऊन स्वारी केली. रशियन लोकांनीं मास्को शहर जाळून फ्रेंचांचा पराभव केला, शिवाय थंडीनें नेपोलियन याचे . फार लोक मेले, तेव्हां तो परत आला. पुढें त्यानें तीन लक्ष पन्नास हजार फौज घेऊन आस्ट्रिया, प्रशिया व रशिया या तिघांच्या जमलेल्या सैन्याबरोबर लढाई केली. या लढाईत तो पराभव पावून पदच्युत झाला (१८१३). त्यास एल्बा बेटांत राहण्याची परवानगी दिली. पुढे ( १८१५ ) नेपोलियन एकाएकीं पळून फ्रान्स देशांत आला आणि अठरावा लुई या पळावयास लावून आपण गादीवर बसला; आणि पुनः यूरोपांतील राजांशी लढाया करूं लागला. शेवटीं तारीख १८ जून रोजीं वातर्लु एर्थे मोठी लढाई झाली. तींत द्यूक ऑफ बेलिंगतन इंग्लिश सैन्याचा अधिकारी, ज्यानें हिंदुस्थानांत पुष्कळ लढाया जिंकिल्या, त्यानें नेपोलियन याचा पूर्ण पराभव केला. नंतर त्यास सेंट हेलीना या बेटांत नेऊन ठेविलें. तेथें तो इ० स० १८२१ सांत मरण पावला.
 शिकंदर व सीझर यांच्या मानानें पाहिलें तर नेपोलिअन याचे पराक्रम फारच मोठे असें म्हटलें पाहिजे. सीझरानें देश जिंकिले, ते सर्व अडाणी होते. पण नेपोलिअन यानें सर्व सुधार- लेलें यूरोपखंड गाजवून दिलें होतें. अहाहा ! काय हें शौर्य ! काय हा पराक्रम ! काय ही बुद्धि ! नेपोलिअन बादशहाचे सर्व उद्देश सिद्धीस जाते तर त्यास लोकांनी अवतारी मानिलें असतें.