पान:गद्यरत्नमाला.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
गद्यरत्नमाला.


हीं दोन्ही रोगांची मुळें आहेत. नेहमीं व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केला नाहीं तर, अन्नपचन न होऊन प्रकृति बिघडते. आपल्या देशांतील श्रीमंत लोक अगदी अशक्त असतात, याचें मुख्य कारण ते व्यायाम करीत नाहींत हैं होय. परदेशांत प्रवा- सांत असतां आपल्या नेहमींच्या संवयी सोडून तेथील हवेच्या मानाने वागले पाहिजे.
 आरोग्य इच्छिणाऱ्याने शरीर, वस्त्र, पात्र, यांस स्वच्छ ठे- विलें पाहिजे. सर्वकाल असंतुष्ट असून कपाळास आंठ्या घालणे, व नेहमीं क्रोधांत असणे, यांपासून प्रकृति बिघडते; म्हणून सर्वदा संतुष्ट व शांत असण्याची संवय करावी. दुःखाचा प्रसंग गुदरल्यास त्रास करून शरीरास इजा करून घेऊं नये. शरीर- प्रकृति नीट असतां, व्यायाम करून जशी ती नीट राखिली पाहिजे; त्याप्रमाणें दुखणे आलें असतां पथ्यास फार जपावें. औषधांपेक्षां पथ्यच मुख्य, अशाविषयीं वैद्यशास्त्राचें मत आहे. तें खालीं लिहितों.

पथ्ये सतिं गदार्तस्य किमौषधनिषेवणम् ॥


पथ्येऽसति गदार्तस्य किम्मौषधनिषेवणम्


 सांप्रत परकीय शिक्षणानें अर्धसंस्कृत झालेल्या कित्येकांस असें वाटतें कीं धर्माचरणाचा आणि आरोग्याचा काय संबंध आहे ? तथापि हें त्यांचे म्हणणे चुकीचें आहे. सतत आरोग्य राहण्यास धर्माचरण आवश्यक आहे असें आर्य वैद्यशास्त्रकारांनी सांगितलें आहे. प्रसिद्ध ' अष्टांगहृदयकार' वाग्भट यांनीं आपल्या ग्रंथांत आरोग्याविषयीं खाली लिहिल्याप्रमाणे लिहिलें आहे.


 १ पथ्यानें वागेल तर रोग्यास औषध कशाला पाहिजे? पथ्य करणार नाहीं तर रोग्यास औषध देऊन काय उपयोग? मनुष्य पथ्यानें वागेल तर औषधाशिवाय देखील बरा होईल, पथ्य कर- णार नाहीं तर औषध फुकट जाईल, असें तात्पर्य.