पान:गद्यरत्नमाला.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन आर्याचा इतिहास.

१९३


दक्ष,दीनांवर दया करणारे, सन्मार्ग चालू करणारे, शूर, श बूंचा पराजय करणारे, सर्व सुखापेक्षां विजयसुख अधिक मान- णारे, मोठे उदार असे होते, असें स्पष्ट दिसतें. वेदांत व- जिलेलीं महत्कृत्यें विद्याचारहीन अशा हलक्या लोकांच्या हातून होण्याचा संभव नाहीं. तसेंच लोकांस उपद्रव देणारे चोर, चाहाड, लबाड, पाखण्डी यांस शिक्षा करून देशास पीडा दे- णान्या क्रूर दुष्टांचें पारिपत्य करून, सन्मार्गाने चालणाऱ्या प्र- जेचें आपल्या कुटुंबाप्रमाणे पालन करून स्वस्थ अन्तःकरणाने राजसूयादि यज्ञ करून देवांस संतुष्ट करणारे बहुत राजे ऋग्वे दादिकांत सांगितले आहेत. यावरून राजनीतिहि त्या वेळीं चांगली होती, असे सिद्ध होतें.