पान:गद्यरत्नमाला.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
गद्यरत्नमाला

.

परमेश्वरस्तोत्रं.


विश्वस्रुष्टया नमूं आम्ही । विश्वपाल तुला नमूं ॥
विश्वसंहारका वन्दूं
वर्षी एकरुचिही
ॲविक्रिय गुणांनी तूं। अवस्था पावशी तसा ॥ २ ॥

 १. कविश्रेष्ठ कालिदासाने स्वकृत रघुवंश महाकाव्यांत एके ठिकाण परमेश्वराचे वास्तवस्वरूप अत्युत्तम रीतीनें वर्णिलें आहे, त्यावरून हे स्तोत्र मराठीत येथे घेतले आहे. मिथ्याभिमानी पर- धर्मी लोकांन आमच्या धर्मग्रन्थांतील पुर्वापर संबन्धरहित वेंचे घेऊन आर्यलोकांस जगन्नियंत्या परमेश्वराच्या वास्तव स्वरूपाचें ज्ञान नाहीं असे दाखविण्याचे यत्न पुष्कळ वेळां केले आहेत. परंतु अन्तःकरण पक्षपातरहित करून पाहील त्यास कळल कौं, आमच्या धर्मग्रन्थांत जसे ईश्वरस्वरूप वास्तविक वर्णिले आहे त्यापेक्षा अधिक चांगल्या रीतीनें वर्णिलेले कोठेंहि आढळणार नाहीं. शब्दभेद असला तरी सर्व जगाचा चालक परमेश्वर सर्व- शक्तिमान् एक आहे ही गोष्ट तत्त्वज्ञान्यापासून तो कवींपर्यंत सर्वा च्या पुढे जागृत आहे. तिचा विसर कधींच कोणास पडला नाहीं. कोणत्याही धर्मास किंवा धर्मपंथास अनुसरणारा असला तरी त्यास ही ईश्वरस्तुति मान्य होण्यासारखी आहे असे समजून हें साधें स्तोत्र येथे दिले आहे. २. विश्वांतील सर्व वस्तूंच्या ठाय उत्पत्ति, स्थिति, लय या तीन गोष्टी दिसतात त्या संबंधानें तुला, उत्पादक, पालक, संहारक, अशा अर्थाची, ब्रह्मा, विष्णु, महेश इत्यादि नांवें प्राप्त झाली आहेत; पण या सर्व गोष्टी करणारा तूं एकच आहेस त्या तुला नमस्कार असो असा या श्लोकांत भाव आहे. यांत एक सच्चिदानंदस्वरूप परमात्मा विश्वव्यापक आहे हा वेदांतशास्त्राचा सिद्धांत सुचविला आहे. ३. पावसाचे पाणी. ४. विकाररहित ५. सत्व, रज, तम, या प्रकृतीच्या तीन गुणां- नीं जगांतील सर्व वस्तु सुखदुःखमोहात्मक आहेत. ईश्वर निर्वि-