पान:गद्यरत्नमाला.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२

.

गद्यरत्नमाला

अध्यायांत "हे राजा, तूं लोखंडाचें चिलखत घालून रणांगणी चाललास ह्मणजे तुझें शरीर मेघासारखें दिसतें. तूं अक्षतशरीर असा जय पाव. हें चांगलें चिलखत तुझें रक्षण करो.” इत्या- दिक अर्थाच्या मंत्रांचे दोन वर्ग आहेत, त्यांत धनुष्य, बाण, योद्धे इत्यादि युद्धाच्या सामुग्रीचें वर्णन केलें आहे. तसेंच आठव्या अष्टकाच्या पांचव्या अध्यायांत " इन्द्र आमच्या निशा- णावर असो; आमचे बाण जिंकोत; आमचे वीर विजयी होवोत. देवहो, आमचें युद्धांत रक्षण करा " असें म्हटलें आहे. याव रून त्या वेळच्या आर्याचा रणांगणांतील उत्साह दिसून येतो.
 ऋग्वेदाच्या चवथ्या अष्टकाच्या पहिल्या अध्ययांत असें झ टलें आहे कीं, " हे अग्ने शत्रूस कोण बांधितात, कोण रक्षण करतात, कोण दान देतात, कोण तेजस्वी होतात, कोण असत्य भाषण करणान्यास सत्य शिकवून रक्षण करतात, कोण सदुपदेश करून दुराचान्याचें रक्षण करतात, " अर्थात् तुझे भक्त, तसेंच ऋग्वेदाच्या चवथ्या अष्टकाच्या दुसऱ्या अध्यायांत ज्याच्या यज्ञांत इन्द्र दुग्धादिमिश्रित सोमरस पितो, तो राजा आपल्या- लोकांसहवर्तमान संचार करून शत्रूचा नाश करतो, प्रजांचें रक्षण करतो” असें म्हटलें आहे. तसेंच कृष्णयजुर्वेदाच्या संहितेंत पहिल्या काण्डाच्या दुसऱ्या प्रपाठकांत राजसूययज्ञांतील रत्नहोम नांवाचें कर्म सांगितलें आहे. हें कर्म बारा दिवस करावयाचें असतें. पहिल्या दिवशीं ब्राह्मणाच्या घरीं, दुसऱ्या दिवशीं क्ष- त्रियाच्या घरीं जाऊन अमुक कर्म करावें, इत्यादि बारा दिव. सांचीं कर्मों सांगितलीं आहेत, त्यांत सहाव्या दिवशीं सेनापतीच्या घरीं, सातव्या दिवशीं सारथ्याच्या घरीं, आठव्या दिवशीं अन्तः- पुरावरील अधिकान्याच्या घरीं, नवव्या दिवशीं ग्रामाध्यक्षाच्या घरीं, दाहाव्या दिवशीं जामदारखान्यावरील अधिकाऱ्याच्या घरी जाऊन अमुक कर्म करावें असें सांगितले आहे. या प्रकारच्या वेदवाक्यांवरून त्या वेळचे आर्य मोठे तेजस्वी, प्रजापालनाविषयीं