पान:गद्यरत्नमाला.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन आर्याचा इतिहास.

१९१


मचीं माणसें, पशु हे सुखी राहोत. तसेच ह्या गांवांत सर्व लोक सुखी निरुपद्रव राहोत " तसेंच ऋग्वेदाच्या पहिल्या अष्टकाच्या दुसऱ्या अध्यायांत "ऋभु अश्विनीकुमारांकरतां सुखकारक रथ करते झाले" असे म्हटले आहे. या प्रकारचे त्या त्या शिल्पांचे त्या त्या काली अस्तित्व दाखविणारे दृष्टांत ऋग्वेदांत पुष्कळ आहेत. कृष्णयजुर्वेदाच्या संहितेच्या चवथ्या काण्डांत सहाव्या प्रपाठकांत संसारास उपयोगी अशा पुष्कळ वस्तु प्रार्थनापूर्वक मागितल्या आहेत, यावरून त्या वेळेच्या लोकांस पुष्कळ कला माहीत होत्या असें निःसंशय सिद्ध होते. आकाशपुष्प, शशशृंग अशा कधींहि नसणाऱ्या खोट्या वस्तु कोणी मागणार नाहीं. अनेक वस्तूंच्या वर्णनावरून त्या त्या वस्तु निर्माण करण्याच्या उपयोगी अशा अनेक शिल्पक्रिया त्या वेळेस होत्या हें आपो- आप सिद्ध होतें. प्राचीन किंवा अर्वाचीन काळी एकादी वस्तु एकदम उत्पन्न झाल्याचा अनुभव नाहीं; तेव्हां त्या त्या वस्तु उत्पन्न करणारीं तीं तीं कारण होती असा तर्क करणें अवश्य आहे.
 ऋग्वेदाच्या तिसन्या अष्टकाच्या सहाव्या अध्यायांत "कोणी विकणाऱ्याने पुष्कळ मोलाची वस्तु देऊन थोडें द्रव्य घेतलें " इत्यादि वाक्य आहे, व त्याच वेदाच्या पहिल्या अष्टकाच्या दु- सन्या अध्यायांत " जो समुद्रांतील नौका जाणतो" असें म्हटलें आहे. तसेंच आठव्या अष्टकाच्या दुसऱ्या अध्यायांत " चांगली रक्षण करणारी, मोठी सुंदर, योग्य वेळीं जाणारी, सुरक्षित, उत्तम प्रकारेंकरून स्वस्थानीं पोंचणारी, चांगले सुकाणूं जिला आहे अशी, कोणतेंहि व्यंग जिला नाहीं अशी, जिला पाणी आंत येण्यास छिद्र नाहीं अशी जी नौका" असें म्हटलें आहे. यावरून त्या वेळेस नौकागमन, व्यापार या गोष्टी प्रचारांत होत्या हें स्पष्ट आहे.
 प्राचीन आर्यलोक युद्धकलेमध्येहि प्रवीण होते याविषयीं पु- ष्कळ प्रमाणें आहेत. ऋग्वेदाच्या पांचव्या अष्टकाच्या पहिल्या