पान:गद्यरत्नमाला.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९०
गद्यरत्नमाला.


वेदांत त्या वेळचे लोक विद्या, शिल्प, कला इत्यादिकांत प्रवीण होते. असे दाखविणारी पुष्कळ प्रमाणे आहेत. लोकस्थितीचा विचार केला असतां असें दिसून येतें कीं, सर्व ठिकाणी प्रथमतः मनुष्यांस अन्न, आणि आच्छादन यांची अपेक्षा उत्पन्न होते. हीं प्राप्त झाल्यावर त्यांस राहण्यास घर असावें असें वाटूं लागतें. अन्न, आच्छादन व घर हीं तिन्ही प्राप्त होऊन निर्वाह होऊ लागला म्हणजे, बायको, मुलें होऊन संसारसुख प्राप्त व्हावे अशी इच्छा होते. एक मनोरथ पूर्ण झाला म्हणजे दुसरा उत्पन्न होतो; अशी स्वाभाविक स्थिती असल्यामुळे, संसारमुखाच्या इच्छेनें मनुष्य अनेक उद्योग करूं लागतात, ही स्थिती वर्तमानकाळीं दृष्टीस पडते. यावरून असें सिसतें कीं, हल्लींच्या मनुष्यांप्रमाणेंच पूर्वीचे लोकहि उद्योग करून अनेक कला उत्पन्न करीत होते. याविषयीं वेदांतील कित्येक प्रमाणे सांगतों. ऋग्वेदाच्या तिसन्या अष्टकाच्या पहिल्या अध्यायांत " बैल सुखानें (नांगर ) वाहोत, शेतकरी सुखाने नांगरीत " असे म्हटले आहे. तसेच ऋग्वेदाच्या पहिल्या अष्टकाच्या दुसऱ्या अध्यायांत "हे पृथ्वी, तूं (आम्हांस ) कल्याणकारक, निष्कंटक राहण्यास स्थल देणारी अशी हो, आम्हांस विशाल गृह दे, " असे म्हटले आहे. या प्रकारच्या वेदवाक्यांचा विचार केला असतां त्या वेळचे लोक शेतकी वगैरे अनेक उद्योग करून धान्यादि निर्वाहाचे पदार्थ उत्पन्न करून, नगरांत, गांवांत, खेड्यांत असे रहात होते, असें सिद्ध होतें.
 नगर, गांव ही व्यवस्था अर्वाचीन आहे असें समजूं नये. ऋग्वेदाच्या तिसन्या अष्टकाच्या सहाव्या अध्यायांत " यज्ञ कर- जान्या दिवोदासास इंद्राने दगडांनी बांधलेली शंभर नगरें दिलीं” असें स्पष्ट वाक्य आहे. तसेच कृष्णयजुर्वेदाच्या चवथ्या काण्डाच्या पांचव्या अध्यायांत " आम्ही बलवान्, तपस्वी, नष्ट शत्रु, असा जो रुद्र त्याची पुष्कळ स्तुति करतों, येणेकरून आ