पान:गद्यरत्नमाला.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन आर्याचा इतिहास.

१८९


भाषेच्या आरंभी उत्पन्न होणारे निकटसंबंधवाचक व संख्यादि- कांचे वाचक जे शब्द ते पिता, माता, स्वसा, भ्राता, दुहिता, द्वि, सप्तन्, इत्यादि संस्कृत शब्दांचेच अपभ्रंश त्या त्या भाषांत त्या त्या अर्थाचे वाचक आढळतात. यावरून हे सर्व लोक आर्यकुलांतलेच असावे असें दिसतें. हीच गोष्ट वर सांगित- लेल्या मनूच्या हाणण्यावरून सिद्ध होते. आणखी मनूनें दहाव्या अध्यायांत असें सांगितलें आहे कीं, व्यभिचारानें, धर्माच्या अज्ञानानें, व स्वकर्माच्या त्यागाने अनेक संकीर्ण जाति उत्पन्न होतात. यावरून असें दिसतें कीं, शकयवनादि लोकहि मूळचे आर्य असून स्वधर्म व स्वकर्म यांच्या त्यागामुळे म्लेंच्छ झाले. यामुळेच ब्राह्मणादि आर्यजन जेथें रहात नाहींत ते देश निंदित होत, असे वेदांत सांगितलें आहे.
 आतां कोणी असा प्रश्न करील कीं, भरतखण्डांत आर्यलो- कांची उत्पत्ति झाल्यास किती वर्षे झालीं ? या प्रश्नाचें उत्तर देणें अशक्य आहे. कारण आयच्या उत्पत्तीच्या काळाचा निर्णय करण्यास प्रत्यक्ष प्रमाण नाहीं. अनुमान करण्यासहि निर्दोषहेतु सांपडणे कठीण. वेदामध्येहि ब्राह्मणवाचक आर्य शब्द सांपडतो. जसे ऋग्वेदाच्या तिसन्या अष्टकाव्या सहाव्या अध्यायांत ' मीं आस भूमि दिली' असे म्हटले आहे. यावरून ऋग्वेदाच्या प्रादुर्भावाच्या वेळेस आर्य प्रसिद्ध होते. तेव्हां त्यापेक्षांहि प्राचीन असें कांहीं प्रमाण आर्याच्या उत्पत्तीविषयीं सांपडेल तर अनुमान करतां येईल, परंतु तसे प्रमाण सांपडत नाहीं.
 हल्लीं आहे त्यापेक्षां शंभर वर्षांपूर्वी कलालौशल्यादिकांची सुधारणा कमी होती, यावरून फार प्राचीनकाळच्या लोकांत विद्या, शिल्प, कला, कौशल्य हैं कांहीं नसून ते केवळ पशुतुल्य असतील असे कित्येक म्हणतात; परंतु तसें म्हणण्यास प्रमाण नाहीं. प्राचीन इतिहास जाणण्याचीं जीं साधनें आहेत त्या सर्वोत ऋग्वेद हा अतिप्राचीन होय असे सर्व पंडित कबूल करतात. त्या