पान:गद्यरत्नमाला.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८
गद्यरत्नमाला.


उत्पन्न झालेला जो ब्राह्मण ' अशीं जीं मनूचीं वचनें त्यांची संगति लागणार नाहीं.
 आतां ब्राह्मणादिजातिविचार हा प्राचीन किंवा अर्वाचीन आहे याचा विचार करूं. हा जातिविवेक प्राचीनच आहे असें हाटलें पाहिजे. कारण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, या मुख्य चार जाति, मनूनें सांगितल्या आहेत. स्वजातीच्या विधिपूर्वक विवाहित स्त्रीपासून जो उत्पन्न होईल तो त्या जातीचा होय. विवाहाशिवाय स्वजातीच्या स्त्रीपासून किंवा विवाहित परजातीय स्त्रीपासून जे उत्पन्न होतात त्यांची संकीर्णजाति होय. ह्मणूनच ब्राह्मणापासून स्वजातीच्या अविवाहित स्त्रीशी व्यभिचाराच्या यो- गानें झालेला तो अवावट होय; असे देवलानें सांगितलें आहे. तो शूद्रासारखा समजावा. त्याचा संस्कार करूं नये. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, या तीन जातींस उपनयनादि संस्कार आहे हाणून त्यांस द्विजाति असें ह्मणतात. कारण एक त्यांचें गर्भापासून जन्म व दुसरें संस्काररूप जन्म ह्मणून ते द्विज किंवा द्विजाति होत. शूद्रांस संस्कार नाहीं ह्मणून ते एकजाति होत. जातिविवेक स्मृतींमध्येंच आहे, वेदांमध्ये नाहीं असें समजूं नये. कारण स्मृति ह्या वेदमूलकच आहेत व वेदांतहि ब्राह्मणादि जातिवाचक शब्द आले आहेत.
 शक, यवन, चीन या जातिहि ब्राह्मणापासूनच झाल्या असें आर्यांचे मत आहे. मनूनें दहाव्या अध्यायांत असें सांगितलें आहे कीं, कित्येक राजे राज्यलोभानें दूरदेशीं गेले त्यामुळे त्यां- मध्ये उपनयनादि संस्कारांचा लोप झाला व त्या देशीं त्यांस धर्म सांगण्यास ब्राह्मणहि नसल्यामुळे ते शूद्र झाले. यावरून आर्य भाषा बोलणारे आणि म्लेच्छभाषा बोलणारे सर्व लोक भर- तखंडांतील लोकांपासूनच परंपरेनें उत्पन्न झाले असें सिद्ध होतें.
 याविषयी आणखी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे ती ही कीं, शक, यवन इत्यादि लोकांच्या भाषांचा विचार केला तर