पान:गद्यरत्नमाला.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन आर्यांचा इतिहास.

१८७


ताच्या उत्तरेकडील प्रदेश हेंच आर्याचे मूलस्थान होय; कारण तेथे तिबेट देश आहे, तिबेट हा स्वर्गवाचक त्रिविष्टप शब्दाचा अप भ्रंश असावा; हें हाणणंहि बरोबर नाहीं. तिबेट हा त्रिविष्टपश- ब्दाचा अपभ्रंश मानला तरी आर्यलोक ज्यास स्वर्ग ह्मणतात तोच हा असें मानण्यासच आधार नाहीं. पृथ्वीहून स्वर्गलोक निराळा, ही गोष्ट श्रुति, स्मृति वगैरे सर्व प्राचीन ग्रन्थ, कोश, काव्यें ना- टके वगैरे अर्वाचीन ग्रन्थ यांत स्पष्ट सांगितली आहे. हिमालया- च्या उत्तरेकडील देशादि आर्यांचेच. तें आर्यभिन्नांचे वसतिस्थान नव्हे असें आर्य लोक मानतात. परंतु तीं पवित्र धर्मक्षेत्रे होत असें समजतात; कारण भारतादि ग्रन्थांत, श्वेतगिरी, कैलास, मा- नससरोवर, उत्तरकुरु, इत्यादिक स्थलांचे माहात्म्य तीर्थयात्रेच्या संबंधानें वर्णिले आहे. या स्तुतिवचनांवरून, हीं क्षेत्र हाच काय तो स्वर्ग, दुसरा देवनिवासरूप कोणताहि स्वर्ग नाहीं, असा श्रुतिसिद्धांत आहे असे मानतां येत नाहीं. कारण ब्रह्मदेवानें पृथ्वी उत्पन्न केली, स्वर्ग उत्पन्न केला, अशीं जीं श्रुतिस्मृति- वाक्यें आहेत ती असंगत होतील. भरतखंडांतील प्रदेशास ब्रह्मा- वर्त, आर्यावर्त, ब्रह्मपिदेश अशी अन्वर्थक नांवें मन्वादिकांनी दिली आहेत. हा हाणजे ब्राह्मण जेथें आवर्तते ह्मणजे उत्पन्न होतात ते ब्रह्मावर्त आर्य जेथें उत्पन्न होतात तें आर्यावर्त. ब्रह्मपींचा जो देश तो ब्रह्मर्षिदेश. या अन्वर्थक नांवांवरून भ रतखंड हेंच आर्याचे मूलस्थान असे स्पष्ट होतें. आब्रह्मभु वनाल्लोकात्पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते ॥ " इत्यादि स्मृतींमध्ये तसेच 'न स पुनरावर्तते, इत्यादि श्रुतींमध्ये ' आवर्तते' याचा अर्थ उत्पन्न होतो असाच प्रसिद्ध असून आ उपसर्गपूर्वक वृत् धातूचा येणें असा अर्थ कल्पून, आर्य जेथे आले तें आर्यावर्त अशी कल्पना करणें अयोग्य होय. कारण : ब्रह्मवर्तदेशांत जो परंपरेने चालत आला, 96 या देशांत