पान:गद्यरत्नमाला.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६
गद्यरत्नमाला.


 कित्येक असे म्हणतात कीं, आर्य लोकांस हिंदु असें ह्मणतात, यावरून ते दुसन्या देशांतून येथे आले असावे. पूर्वी जलप्रलय झाला, तेव्हां सर्व मनुष्यादिप्राणी उदकांत बुडून नष्ट झाले. का- केसस पर्वतावर एक पुरुष जिवंत राहिला; त्याची संतति वाढून तिचा एक भाग युरोपखंडांत गेला व दुसरा इराणांत आला; तेथे त्यांची पुष्कळ यसाहात झाल्यावर त्यांतील कित्येक लोक सिं धुनदाच्या दोन्ही तीरांस येऊन राहिले, हाणून त्यांस सिंधु असें म्हणतां म्हणतां कांहीं दिवसांनी हिंदु असें म्हणूं लागले तेच हे भरतखंडांतील आर्य होत. भरतखंड हे त्यांचे मूलस्थान नव्हे. ही कल्पना सर्वांशीं संभवत नाहीं. तो जलप्रलय सर्व ठिकाण झाला असें नाहीं. याकरता एकच पुरुष शेष राहिला असें म्हणतां येत नाहीं. सर्व ठिकाणी जलप्रलय झाला असें म्हटलें तर एकच पुरुष प्रलयकालच्या उदकांत बुडाला नाहीं, याजवर विचारी मनुष्य विश्वास ठेवणार नाहीं.
 तसेंच जे आर्यभिन्न लोक स्वदेश सोडून भरतखंडांत आले त्यांचा परिचय प्रथमतः सिंधुदेशांतल्या लोकांशीच झाला, त्यामुळें सर्व आर्य लोकांस, त्यांनीं तेंच नांव दिले असावें अशीहि कल्पना संभवते. जलप्रलयाची गोष्ट अंशतः खरी आहे; कारण शतपथ ब्राह्मण, भारत, रामायण इत्यादि प्राचीन ग्रन्थांत मत्स्यावतारकथा वर्णिली आहे. जलप्रलयाच्या वेळेस मनु आपल्या परिवारासहवर्त- मान नावेंत बसला, ती नाव परमेश्वराने मत्स्यरूप घेऊन जलप्र- लयांतून तारिली. नंतर जलप्रलयाचें संकट गेल्यावर मनु पुत्रपौत्रा- दिकांसहवर्तमान सुखी झाला. त्यापासून सर्व प्रजाउत्पन्न झाल्या म्हणूनच सर्व द्विपादप्राण्यांस, मनुज, मनुष्य, मानव हीं नांवें प्राप्त झाली.
 कित्येक असें म्हणतात की, मनूपासून मनुष्य झाले, मनु दे- वापासून झाला, देवाचें स्थान स्वर्ग होय, या गोष्टी वेदादिकांत सांगितल्या आहेत. यावरून असें सिद्ध होतें कीं, हिमालय पर्व-