पान:गद्यरत्नमाला.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्राचीन आर्याचा इतिहास.

१८५


प्राचीन आर्याचा इतिहास.


 स्वयंभू सर्वशक्तिमान् सच्चिदानंद परमेश्वरानें हें अनंतचमत्का- रपरिपूर्ण जग उत्पन्न केलें. खसखशी ऐवढ्या वटवीजामध्यें जमा मोठा वटवृक्ष लीन असतो त्याप्रमाणें हें जग सृष्टिकालापूर्वी नामरूपविरहित सत्स्वरूपानें परमेश्वरस्वरूपीं लीन होतें असें श्रुती- मध्ये सांगितलें आहे. जेव्हां परमेश्वरास सृष्टि करण्याची इच्छा उत्पन्न झाली, तेव्हां त्यानें प्रथमतः आकाश, त्यापासून बायू, वायूपासून अनि अग्नीपासून उदक, उदकापासून पृथ्वी, पृथ्वी- पासून ओषधि, ओषर्धीपासून अन्न, अन्नापासून पुरुष याप्रमाणे सृष्टि उत्पन्न केली. असा सृष्टिक्रम यजुर्वेदाच्या तैत्तिरीयशाखेत सांगितला आहे. सृष्टि निर्माण करण्याची इच्छा झालेल्या परमा- त्म्यास हिरण्यगर्भ असे ऋग्वेदाच्या आठव्या अष्टकाच्या सातव्या अध्यायाच्या सातव्या वर्गात म्हटलें आहे. मन्वादिस्मृतिकारांनीं हि हाच उत्पत्तिक्रम सांगितला आहे. यावरून भूतभविष्यवर्तमान सर्व वस्तु सर्वज्ञ सर्वशक्तिमान् परमेश्वरापासून उत्पन्न होतात असें आयचे मत आहे; हें स्पष्ट होतें.
 आतां आर्याचे मूलस्थान कोणते याविषयीं विचार करूं. ब्रह्मा- वर्ताजवळचे कुरुक्षेत्र, मत्स्यदेश, पांचालदेश, शूरसेनदेश, हे सर्व ब्रह्मर्षीचं स्थान होय. या देशांत जन्मलेल्या ब्राह्मणांपासून पृथ्वी- तील सर्व लोकांनी आपापले धर्म शिकावे, असें मनुस्मृतींत दुसऱ्या अध्यायांत सांगितलें आहे. कुरुक्षेत्राचें वर्णन शतपथब्रा- ह्मण, जाबालोपनिषत्, इत्यादिकांत सांपडतें. तसेंच, गंगा, यमुना, सरस्वती, शुतुद्रि, परुणि हीं भरतखंडांतील प्रसिद्ध नद्यांचीं नांवें ऋग्वेदांत सांगितलीं आहेत, व सिता ( पांढरी - गंगा) आणि असिता ( काळी-यमुना ) ह्या नद्यांचा जेथें संगम होतो तेथे स्नान करतात ते स्वर्गास जातात, असें ऋग्वेदांत सांगितलें आहे; यावरून कुरुक्षेत्रादि देशच आर्याचें मूलस्थान होय हे स्पष्ट आहे.