पान:गद्यरत्नमाला.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४
गद्यरत्नमाला

.

भाध्यें, वार्तिकें व टीका झाल्या आहेत कीं, बुद्धिमान् शतायु मनुष्याच्या हातून देखील त्या सर्वांचे पर्यालोचन होणार नाहीं.
 धर्म, आचार, व्यवहार, प्रायश्चित्त, नीति इत्यादि विषयांचें सविस्तर प्रतिपादन करणारे पद्यात्मक स्मृतिग्रन्थ मनु, याज्ञ- वल्क्य, व्यास, वसिष्ठ इत्यादि अनेक ऋषींनी केले. या सर्वोत मनु आणि याज्ञवल्क्य यांचे ग्रन्थ विशेष विस्तृत असून सर्व मान्य झाले आहेत. मनुस्मृतीच्या नुकत्याच सात टीका छापून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावरून मनुस्मृतीस आर्यलोक केवढा मान देत आले हैं स्पष्ट कळेल.
 आतां तिसरा ग्रन्थसमूह पुराणें. हीं अठरा आहेत, हीं सर्व व्यासानें केलीं; यांत सृष्टीची उत्पत्ति, स्थिति, लय यांचें वर्णन, देवदैत्यांचे वर्णन, प्राचीन राजांच्या भक्तिज्ञानवैराग्यपर कथा, कर्म, उपासना, ज्ञान यांचें निरूपण, इतिहास इत्यादि गोष्टी येतात.
 चवथा विभाग इतर ग्रन्थ, याचाहि प्राचीनकाळापासून भरणा होत आला आहे; यांतहि वैद्यशास्त्र, शिल्पशास्त्र, यासा- रख्या अत्यंत उपयुक्त विषयांवर चरक, सुश्रुत, वाग्भट, वराह- मिहिर अशा महापंडितांनीं अत्युत्तम ग्रन्थ केले आहेत. तसेच मध्व, रामानुज, वल्लभ इत्यादिकांनी केलेले अनेक मतग्रन्थ आहेत. तसेंच वाल्मिक्यादिकवींनीं केलेले काव्यादि ग्रन्थ व कालिदासादिकवींनीं केलेले नाटकादि ग्रन्थ येतात, यांशिवाय शाक्तमार्गादिप्रतिपादक अनेक तंत्रग्रन्थ आहेत. यांशिवाय वेदास ईश्वरप्रणीतत्व न मानणारे बौद्ध, जैन इत्यादिकांचे हि असंख्य ग्रन्थ आहेत. असा हा संस्कृतभाषाग्रन्थसमुद्र अपार, याचे वर्णन करायें तितकें थोडेंच. स्थलसंकोचामुळे याचें विशेष वर्णन येथे करता येत नाहीं. मराठी वाचकांकरितां अति संक्षिप्त दिक्प्रदर्शन केले आहे.