पान:गद्यरत्नमाला.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतभाषां

.

१८३


झणून वेदांगें झाली. वेदांगें सहा आहेत. तीं येणेंप्रमाणें. .-१ शिक्षा, २ कल्प, ३ व्याकरण, ४ निरुक्त, ५ छंद, ६ ज्योतिष. शिक्षेमध्यें वेदमंत्रांचे उच्चारण कसे करावें हें सांगितलेले असतें. शिक्षाग्रन्थ पाणिनि, शौनक इत्यादि ऋषींनी केले. कल्प म्हणजे वर सांगितलेले शाखासंप्रदायप्रवर्तक जे ऋषि त्यांनी केलेले य ज्ञादि क्रिया व उपनयनादि संस्कार यांच्या अनुष्ठानांचे विस्तरशः प्रतिपादन करणारे ग्रन्थ वेदघटकशब्दांचे खरे स्वर व अर्थ कळावे, वेदांत सामान्यरीतीनें मंत्र सांगितले आहेत त्यांत विशे- घप्रसंगी विभक्ति वचन यांचा भेद करून त्यांचा योग्य रीतीनें उपयोग करतां यावा, इत्यादि कारणांकरितां प्रकृतिप्रत्ययरूपानें शब्दांचें विवरण करून पाणिनीनें व्याकरणशास्त्र केलें. वेदमंत्रांचे अर्थ, देवता व योजना इत्यादि कळावीं ह्मणून यास्कऋषीनें निरक्त केलें. वेदांतील ऋचांचे वेगवेगळाले छंद कळावे हाणून पिंगलानें छंदःशास्त्र केलें. वेदांत सांगितलेले याग यथाकालीं व्हावे ह्मणून गर्गमुनीनें ज्योतिःशास्त्र केलें. या आद्यग्रन्थांवर पुष्कळ टीकाग्रंथ होऊन कित्येक शास्त्रांचा विस्तार इतका झाला आहे की, त्यांच्या समग्र ग्रन्थांचे अध्ययन सर्व आयुष्यांत एका मनुष्याच्याने होणार नाहीं.
 यानंतर वेदप्रतिपादित धर्म व ईश्वर यांचे वास्तव ज्ञान व्हावें ह्मणून सहा दर्शनें ह्मणजे तस्त्रप्रतिपादक शास्त्रे उत्पन्न झाली. तीं येणेंप्रमाणें. - १ सांख्य, २ योग, ३ न्याय, ४ वैशेषिक, ५ धर्ममीमांसा व ६ ब्रह्ममीमांसा. सांख्यशास्त्र कपिलमहामुनीनें केलें. योगशास्त्र पतंजलीनें केलें. न्यायशास्त्र गौतममुनीनें व वैशेषिक कणादमुनीनें केलें. धर्ममीमांसेचा कर्ता जैमिनिमुनि व ब्रह्ममीमांसेचा कर्ता व्यास्मुनि.हे सर्व मुनि ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान् सच्चिदानंदस्वरूप, सर्वदुःखातीत आहे, वेद हा तस्कृत आहे, ह्मणून प्रमाण आहे, असे मानतात. यांनी जीं त्या त्या शास्त्राची मूलभूत सूत्रे केलीं त्यांवर इतकी