पान:गद्यरत्नमाला.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२
गद्यरत्नमाला.


कर्तृक असावा असें सिद्ध होतें. सांप्रतकाळीं छापखान्यावरून किंवा प्रकाशकांवरून ग्रन्थाची प्रसिद्धि होते, त्याचप्रमाणे ज्या ज्या ऋषींनी त्या त्या विशेष वेदभागांतील कर्मादिकांचे अनुष्ठान केलें त्यांच्या नांवाने त्यांची प्रसिद्धि झाली हे स्वाभाविक आहे.
 प्राचीनकाळचे ऋषि सर्व वेदराशीचे अध्ययन करीत. त्यांनी विषय संबंधानें वेदाचे चार भाग कल्पिले त्यांस अनुक्रमे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद अशीं चार नांवें दिलीं, यांपैकीं प्रथम तीन हे आर्याच्या मुख्य धर्मक्रिया जे यज्ञ त्यांस उपयुक्त आहेत. चवथ्याचा यज्ञकर्मानुष्ठानाशीं विशेष संबंध नाहीं, एव- व्यावरून प्राचीन ग्रन्थांत कोठें कोठें वेदत्रयी हाणजे तीन वेद असें म्हटलें आहे. सर्व वेदांमध्ये प्रतिपादित विषय तीन, कर्म, उपासना आणि ज्ञान. प्रत्येक वेदाचे मंत्र आणि ब्राह्मण असे दोन विभाग कल्पिले आहेत. मंत्रभागास संहिता असें ह्मणतात. यांत यज्ञमंत्रांचा संग्रह असतो. ब्राह्मण भागाचे दोन विभाग कल्पिले आहेत. ज्यांत यज्ञकर्मसंबंधाची विस्तृत चर्चा असते तो विभाग ब्राह्मण या शब्देकरून प्रसिद्ध आहे. ज्यांत उपासना व ब्रह्मज्ञान यांचे प्रतिपादन आहे त्यास आरण्यक किंवा उपनिषत् असें ह्मणतात. प्राचीनकाळीं प्रत्येक वेदाचे अध्ययनसंप्रदायप्र- वर्तक अनेक ऋषि होऊन गेले, त्यांच्या नांवांवरून प्रत्येक वे दाच्या अनेक शाखा झाल्या, त्यांपैकी कित्येक प्रसिद्ध आहेत व कित्येक उच्छिन्न झाल्या. याप्रमाणे संस्कृत भाषेतील ग्रन्थसमू- हाचा जो अतिप्राचीन भाग त्याचें अतिसंक्षिप्त वर्णन झाले.
 आतां दुसरा भाग स्मृति या प्राचीन काळच्या ऋषींनीं वेदार्थाचें स्मरण करून केल्या, हाणून त्यांस स्मृति असें ह्मणतात. स्मृति दोन प्रकारच्या आहेत. सूत्रात्मक आणि श्लोकात्मक- सूत्रात्मक स्मृति प्राचीन आहेत. वेद नेहमीं शुद्ध रीतीनें झणतां यावा. त्याच्या अर्थाचें सत्य ज्ञान निरंतर सारखें रहावें, त्यांत सांगितलेल्या कर्माचें अनुष्ठान यथाविधि व यथाकाली व्हावे