पान:गद्यरत्नमाला.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृत भाषा.

१८१


निदान पंधरा हजार वर्षांपूर्वी वेदाची उत्पत्ति झाली असें मानलेच पाहिजे. आधुनिक विद्वान वेद मनुष्यप्रणीत ह्मणतील तर पंधरा हजार वर्षांपूर्वी हल्लींपेक्षां अधिक विद्याप्रसार होता असें त्यांस कबूल केलें पाहिजे. कारण विद्याप्रसार विपुल अस- ल्याशिवाय विशाल ज्ञानाचें वेदरूप भांडार कसें उत्पन्न होईल ? आधुनिक विद्वानांचे हाणणें कीं, विद्याप्रसार हल्लीं विशेष आहे, हें खरें असेल तर पंधरा हजार वर्षांपूर्वी लोक अज्ञानांधकारांत असतील, तेव्हां सर्वज्ञ ईश्वराशिवाय वेदासारखा प्रमाणभूत ग्रन्थ कोण करील ? याप्रमाणें आधुनिकांचे तर्क परस्परांस बाधक हो- ऊन वेद ही अमानुप्रकृति आहे असें मानणेंच सयुक्तिक दिसतें असे शास्त्रज्ञांचे ह्मणणे आहे. वेद ही अमानुप्रकृति आहे असें मानण्यास दुसरे असे कारण कीं, अतिप्राचीन काळीं झालेले मनुस्मृति, महाभारत इत्यादि ग्रन्थांतील ज्ञान वेदमूलक आहे असे ते ग्रन्थच ह्मणतात; परंतु वेदप्रतिपादित ज्ञान स्वतः प्रमाण होय, त्यास दुसन्या ग्रन्थाचे प्रमाण नाहीं. त्यास दुसरा आधार होता असे दाखवितां येत नाहीं. वेदाच्या अमुक भागाचे अमुक ऋषि द्रष्टे असें सांगितलें आहे, त्यावरून हे ऋषिच त्या त्या वेदभागांचे कर्ते असे कित्येकांचे ह्मणणे आहे; परंतु हें सयु- क्तिक नाहीं असें शास्त्रज्ञांचें ह्मणणे आहे. कारण स्मृतिकार अनेक असल्यामुळे ते जसा कित्येक विधिनिषेध स्थलीं स्वमतप रिपुष्ट्यर्थ किंवा मतभेदार्थ दुसऱ्या ऋषीचा नांवानें उल्लेख कर तात तसें वेदांत दृष्टीस पडत नाहीं. अनेक कर्ते असते तर अशी गोष्ट अवश्य झाली असती. एकाद्या ग्रन्थकारानें पुष्कळ ग्रन्थ केले ह्मणजे तो कारणपरत्वें पुढील ग्रन्थांत आपल्या पूर्वीच्या ग्रन्थांचा उल्लेख करतो. याज्ञवल्क्य ऋषीनें धर्मशास्त्रांत योगा- विषय उल्लेख करून माझ्या योगशास्त्रांत हैं पाहावें असें म्हटलें आहे, त्याप्रमाणे यजुर्वेदांत 'ऋग्वेदांत हे सांगितले आहे ' असा उल्लेख वारंवार येतो. या व इतर अनेक प्रमाणांवरून वेद एक