पान:गद्यरत्नमाला.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८०
गद्यरत्नमाला.


होतें ह्मणून यास श्रुति असें हाणतात. तसेंच यापासून धर्माचें ज्ञान होतें हाणून याला वेद असें हाणतात. हा ईश्वरप्रणीत झणजे परमेश्वरानें केलेला आणि अनादि असें आर्याचें मत आहे. ईश्वरप्रणीत याचा अर्थ असा आहे कीं, मनुष्याच्या ज्ञानास अगम्य असे जे स्वर्गादि विषय ते ज्यांत प्रतिपादित आहेत तो ग्रन्थ असा ग्रन्थ, ईश्वरप्रेरणेशिवाय होणार नाहीं हें उघडच आहे. कोणी असें ह्मणेल कीं, पृथ्वींत जे आर्यधर्माशिवाय दुसरे धर्म आहेत त्यांस अनुसरणारे सुद्धां आपापली आद्य धर्म- पुस्तकें ईश्वरप्रणीत असें ह्मणतात. त्यावर शास्त्रज्ञांचें असें उत्तर कीं, भाषाशास्त्रावरून व इतिहासारून त्यांचे आधुनिकत्व स्पष्ट दिसतें व कित्येकांचे कर्तेहि ज्ञात आहेत, यावरून तीं वास्तविक ईश्वरप्रणीत नसून तत्तद्धर्मप्रवर्तकांनी श्रद्धादायार्थ त्यांस ईश्वरप्रणीतत्व सांगितलें आहे.
 ईश्वरप्रणीतत्वाविषयीं दुसरें प्रमाण असें कीं, या वेदाचा ईश्वराशिवाय दुसरा कर्ता कोठें उपलब्ध नाहीं. आतां कोणी झल कीं, असे कित्येक ग्रन्थ आहेत कीं, त्यांचे कर्ते कोण हैं। कळत नाहीं छाणून त्यांस ईश्वरप्रणीत ह्मणावें कीं काय ? यावर शास्त्रज्ञ उत्तर असें देतात कीं, लहान सहान सामान्य ग्रंथांच्या कर्त्यांची उपलब्धी नसली तरी अनेकज्ञानपरिपूर्ण सर्व आर्यधर्मा- धार जो वेदासारखा मोठा ग्रन्थ त्याचा कर्ता मनुष्य असल्यास तो अज्ञात राहील व अशा अज्ञात मनुष्यास लोक अनन्यभावें अनुसरतील हें संभवत नाहीं. आधुनिक विद्वान् प्रतिपादन करतात कीं, वेदाचा कर्ता मनुष्य असेल. तेच आणखी असेंहि झणतात, कीं, जगांत पूर्वी सुधारणा नव्हती, अलीकडे होत चालली आहे. ह्रीं त्यांचीं दोन प्रतिपादने एकमेकांस खोडून टाकतात. महाभारतांत कित्येक गोष्टींचे काल सांगितले आहेत, त्यावरून गणित करतां असें सिद्ध होतें कीं, सात हजार वर्षो पूर्वी भारतसंग्राम झाला. यावरून व इतर प्रमाणांनी पहातां