पान:गद्यरत्नमाला.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संस्कृतभाषा.

१७९


झाली असली तरी एककाळी किंवा भिन्नकाळीं कांहीं थोड्या वेगळाल्या ठिकाणी उत्पन्न झाली. मनुष्याच्या शरीररचनेचा विचार केला हाणजे पृथ्वींतील सर्व मनुष्यांचे एक उत्पत्तिस्थान हाणतां येत नाहीं; त्याप्रमाणे भाषावयव जे शब्द त्यांच्या रच- नेचा विचार केला ह्मणजे सर्व पृथ्वींतील भाषा एका एका मूळाचा विस्तार असें ह्मणतां येत नाहीं.
 हल्लीं पृथ्वीवर सुमारे ९०० वेगळाल्या भाषा आहेत; त्यांचे मूळाच्या संबंधाने युरोपांतील विद्वानांनीं, आर्य, तुराणी आणि शमी, असे तीन वर्ग मानिले आहेत.
 संस्कृत, झेंद, लातीन व ग्रीक, या व यांच्यापासून झालेल्या एशिआ व यूरोपखंडांतील भाषा व दुसन्या कित्येक भाषा आ- विगत येतात.

संस्कृतभाषा.


 सांप्रतकाळीं भूतलावर ज्या प्राचीन भाषा उपलब्ध आहेत त्या सवीत संस्कृत भाषा अतिप्राचीन होय, हे अर्वाचीन शोधक विद्वानांनी सप्रमाण सिद्ध केलें आहे. ऋग्वेद संहितेइतकें प्राचीन पुस्तक जगांत दुसरें कोठें नाहीं; असे विद्वानांनी सिद्ध करून दाखविले आहे. ऋग्वेद संहितेची भाषा हैं संस्कृत भाषेचें आद्य स्वरूप होय. त्याच्या पूर्वी तिचे वेगळे स्वरूप होतें असें मानिलें तरी तें कसें होतें हैं आतां सांगतां यावयाचें नाहीं. ऋग्वेदसंहि तेच्या कालचे आर्यलोक त्या काळीं विद्या, कला इत्यादि सर्व गोष्टींत सर्व जगांत विशेष सुधारलेले होते, हें पुढें प्राचीन आर्याचा इतिहास यांत लिहिल्यावरून स्पष्ट कळेल.
 ऋग्वेद संहितेपासून अर्वाचीन काव्यनाटकांपर्यंत संस्कृत भाषेत जो ग्रंथसमूह सांपडतो त्याचे श्रुति, स्मृति, पुराण आणि इतर ग्रन्थ असे चार विभाग कल्पिले आहेत. यांपैकी पहिला ह्मणजे श्रुति हा अति प्राचीन भाग होय. यापासून धर्माचें श्रवण