पान:गद्यरत्नमाला.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
द्यरत्नमाला


मूलशोधाकडे लक्ष्य फार लागलें आहे. त्यांचे असे पूर्वपक्ष आहेत कीं, ईश्वरानें मनुष्य उत्पन्न करून त्यास वाणी म्हणजे भा- पणद्वारा मनोगत दुसन्यास कळविण्याची शक्ति दिली; असे प्रा- चीन ग्रंथांत सांगितलें आहे, तर ईश्वराने दिलेली ती भाषा को- णती असावी. कारण प्राचीन अशा अनेक भाषा आढळतात व त्यांतही कालभेदानें पुष्कळ भेद आहेत. यावर कित्येकांचें असे म्हणणे आहे की, जगांत मनुष्याच्या सुखास साधनीभूत अशा अनेक कला आहेत, परंतु त्या ईश्वरानें मनुष्यांस एकदम दिल्या नाहींत, तर त्या बीजरूपाने त्याने प्रथमतः उत्पन्न केल्या. उद- कसेचनादि मनुष्यश्रमानें अतिसूक्ष्म बीजाचा अतिविशाल वृक्ष होतो; पदार्थामध्ये जे गुण ईश्वरानें ठेविले आहेत त्यांचे ज्ञान - सजसे वृद्धिंगत होत जाते तसतशा अनेक कल्पना होत जातात, त्याप्रमाणे भाषणशक्ति बीजरूपानें मनुष्यांत होती, तीच हळूहळू सुधारत बहुत कालानें भाषारूप पावली. याकरितांच फार प्राचीन भाषांची तुद्धां कालभेदानें अनेक रूपे आढळतात. ज्या रूपानें प्राचीन भाषा सांप्रतकाळीं आढळतात त्यांची पूर्व स्थिति काय असावी अशाविषयीं अनेक विद्वानांनी अनेक तर्क केले आहेत. कित्येक म्हणतात, आरंभी मनुष्यें केवळ पशुपक्ष्यांप्रमाणे अव्यक्त- ध्वनीच्या योगानें इंगित कळवीत असतील, नंतर सुधारणा हो- ऊन व्यक्त वर्णोच्चार करू लागली. नंतर वर्णसंयोग करून मनु- ध्यानी शब्द उत्पन्न केले. असे अनेक विद्वानांचे अनेक तर्क आहेत. तथापि सर्वोचा असा सिद्धांत झाला आहे कीं, संस्कृत वैयाक- रणांनीं जे धातु म्हणून मानिले आहेत, तें भाषेचें मूळ होय. त्या- पलीकडे भाषेची काय स्थिति असावी, याचा शोध लागत नाहीं. जगातील सर्व भाषांचें मूळ एक असून देशकालभेदानें एकाच अनेक रूपांतरें होऊन पुष्कळ भाषा अगदी वेगळाल्या झाल्या. यत्न केला असता त्याचे एकमूलत्व सिद्ध करितां येईल. कित्येकांचे पण असे आहे कीं, भाषा पूर्वी कशीहि उत्पन्न