पान:गद्यरत्नमाला.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाषोत्पत्ति.

१७७


च्या संबंधानें खरें नाहीं. दुसऱ्या पक्षाचें ह्मणजे असें आहे की सर्व पृथ्वींतील मनुष्ये एकाच मूलाचा विस्तार आहे हें संयुक्तिक व संभवनीय दिसतें. कारण शरीररचनेंत भेद फारच थोड्या ठिकाण आढळतो; व तोहि मूल भेदामुळे नसून हवा, पाणी, भक्ष्य इत्यादिकांच्या भेदामुळे झालेला आहे.
 वर मनुष्याच्या उत्पत्तीविषयीं जो जिज्ञासेचा प्रकार सांगि तला तसाच भाषेच्या पूर्वस्थितीच्या जिज्ञासेचा आहे; तथापि हा सर्व देशांत सारखा नाहीं, प्राचीन काळीं भरतखंडांतील ऋषीचें भाषा चमत्काराकडे फारच लक्ष लागले होते. व्याकरण व व्युत्पत्ति या विषयांवरील त्यांचे ग्रंथ पाहिले म्हणजे मोठें आश्चर्य वाटते. शहांचें पृथक्करण करून त्यांनीं असें ठरविलें कीं संस्कृत भाषेतील सर्व शब्द क्रियावाचक धातूंपासून झाले. ( सर्व धातुजम् ) यामुळेंच बहुतेक संस्कृत शब्दांची धात्वर्थमूलक उत्पत्ति सांगता येते. हा जो शद्वांची धात्वर्थमूलक उत्पत्ति मां- गण्याचा प्रकार त्यास " व्युत्पत्ति " (वि + उत्पत्ति ) असें नांव पडलें. कालांतरानें कित्येक धातूंपासून उत्पन्न झालेलीं नामें मात्र भाषेत राहून ते धातु नष्ट झाले, त्यामुळें, कित्येक शब्दांची व्युत्पत्ति सांगतां येईना. तेव्हां कांहीं शब्द अव्युत्पन्नही असतात असे मानून कांहीं पंडितांनीं व्युत्पन्न आणि अभ्युत्पन्न असे श दांचे दोन विभाग केले. तथापि सर्वोचें मत असें आहे की, मनुष्यांचे आद्यस्थान भरतखंड होय, व आद्यभाषा संस्कृत होय. जे भरतखंडांतील आर्यलोक राज्यादिलोभानें दूरदेशीं गेले ते आर्याचाररहित झाले; व विद्वान् आयचा समागम नस- ल्यामुळे अशुद्ध बोलूं लागले, ते म्लेच्छ म्हणजे अशुद्ध बोलणारे झाले. यामुळेंच पुष्कळ भाषांत पितृ, मातृ इत्यादि निकटसं- बंधवाचक व द्वि, त्रि इत्यादि संख्यावाचक शब्द संस्कृत त्या त्या शब्दांचे अपभ्रंश आहेत.
 आलीकडे युरोपांतील सुधारलेल्या देशांतील विद्वानांचे भाषा-