पान:गद्यरत्नमाला.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७६
गद्यरत्नमाला.


अपशब्दादिकांचें उच्चारण करितो, तो ईश्वराच्या घरी मोठा पापी ठरेल यांत संशय नाहीं.

भाषोत्पत्ति.

 जिज्ञासा ( जाणण्याची इच्छा ) हा गुण परमेश्वरानें मनुष्याच्या अंग ठेविला आहे. याच्या योगानें जगांत अनेक मोठी कार्ये उत्पन्न होतात. मोठमोठ्या उपयुक्त शास्त्रांचें आदिकरण जिज्ञासा होय. पदार्थांचे गुण कळल्यावर त्यांपासून जगास पुष्कळ उपयोग होतो; तथापि प्रथमतः तत्ववेत्त्यांचं लक्ष्य उपयोगाकडे नसतें, ते केवळ जिज्ञासेनेंच प्रवृत्त होतात, परमेश्वरानें सृष्टि उत्पन्न कशी केली याविषयीं प्राचीन काळापासून सुधारलेल्या सर्व देशांतील तत्ववेत्ते आपआपल्या ज्ञानवृद्धीच्या मानानें विचार करून आपल्या समजुतीप्रमाणें सिद्धांत करीत आले. सर्वोच्या सिद्धांतांत थोडाबहुत फरक आहे; तथापि परमेश्वरानें सृष्टिकर्ता एक प्राणी उत्पन्न केला; यापासून हा सगळा विस्तार आहे, या विषय सर्वांचें एकमतच आहे. आलीकडे युरोपांतील सुधार- लेल्या देशांत जगाची पूर्वस्थिति जाणण्याविषय उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. तीमुळे भूगर्भशास्त्र वगैरे अनेक विद्या उत्पन्न झाल्या आहेत. तिकडल्या विद्वान लोकांत मनुष्याच्या उत्पत्ती- विषय दोन पक्ष झाले आहेत. शरीरच्छेदन करून तदंतर्गत मांस, अस्थि, स्नायु, मजा इत्यादिकांची परीक्षा करितां या संघ- धानें कित्येक मनुष्यजातींच्या शरीररचनेंत परस्पर भेद दृष्टीस पडतो, त्यामुळे एका पक्षाचें झणणें असें आहे कीं, हल्लींची सर्व मनुष्ये एकाच जातीचा विस्तार नव्हे; एकाच काळ किंवा भिन्न काळीं कांहीं थोड्या स्थळीं मनुष्यें फार प्राचीन काळीं उत्पन्न झाली; त्यांचा पुढे विस्तार झाला, या कारणानें शरीररचनेंत भेद आहे. एकाचा सर्व विस्तार हें जें प्राचीन आद्यग्रंथांचे हाणणें आहे तें त्या त्या देशाच्या संबंधानें माल खरें आहे; सर्व पृथ्वी-