पान:गद्यरत्नमाला.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जनावरांची भाषा.

१७५


तां परमेश्वरानें मनुष्यांस वाणी दिली आहे. वाणीच्या योगानें मनुष्य सर्व प्राण्यांत श्रेष्ठ झाला आहे. वाणीच्या योगानें सर्व पृथ्वी आपलीशी करून इतर सर्व प्राण्यांस मनुष्यानें आपल बंदे चाकर करूल टाकिलें आहे. हिच्याच योगाने जगांत विचार वाढून मनुष्याच्या अंगीं परमेश्वररूप जाणण्याची योग्यता आली आहे. इतर प्राणी वृक्षादी स्थावर पदार्थांसारखे उत्पन्न होतात, घ लय पावतात. मनुष्य मात्र मी कोण, कोठून आलों, मला कोण उत्पन्न केलें, या विश्वाचा चालक कोण, वगैरे गोष्टींचा विचार करून परमेश्वरप्राप्ति करून घेतो. ही शक्ति त्यास वाणी- पासून प्राप्त झाली आहे.
 इतर प्राण्यांस वाणी नाहीं; परंतु तेही खुणांनीं व अव्यक्त शब्दांनी आपल्या मनांतील उद्देश दुसन्यास कळवितात. लहान वासरू घरी ठेवून रानात चरावयास गेलेली गाय परत आली म्हणजे दुरून हंबरू लागते; तेव्हां तिचें वासरूं तिला गोठ्यांतून जवाब देतें हें पाहिले म्हणजे असें वाटतें कीं, मायलेकरें एक- मेकांशी बोलतच आहेत. कोंबडी फिरत असतां भक्ष्य सांपडलें हणजे शब्द करून आपल्या पिलांस जवळ बोलाविते व तींही तिची इच्छा जाणून लवकर तिच्या जवळ जातात. ती दिसे- नाशी झाली कीं, तीं लागलींच दुःखाचा शब्द करूं लागतात. कोंबडा कोंबडीशी बागडत असतां शब्द करितो, व अनोळखी मनुष्य, कुत्रा, किंवा घार, धरून नेण्यास जवळ आली असतां ओरडतो, या दोन शब्दांत फार अंतर आहे. याचप्रमाणें कुत्रा वगैरे इतर प्राण्यांचेहि हर्षशोकांचे भिन्नभिन्न शब्द आहेत.
 असो, सर्व विश्वाचा विचार करितां असें दिसून येतें कीं, वाणी ही परमेश्वरानें मनुष्यास सर्वात श्रेष्ठ देणगी दिली आहे. शास्त्राभ्यास, ईश्वरगुणानुवाद, उपदेश, इत्यादि वाणीचीं आव- श्यक कृत्यें न करितां जो तिचा वाईट उपयोग करितो, ह्मणजे