१७३
महाद्वीपांतील सर्व देशांतील लोकांस परस्परांच्या अस्तित्वाचें सुद्धा ज्ञान नसे. कित्येक धीट प्रवासी खुपकीनें लांबलांबचा प्रवास करीत; त्यामुळे कांहीं देशांतील लोकांस इतर देशांतील लोकांचें कर्णोपकर्णी ज्ञान होई. तथापि आपल्या देशांत उत्पन्न होणाऱ्या वस्तु त्यांस पाठवाव्या. आपणास न मिळणान्या त्यांच्या देशांतून आणाव्या, वगैरे गोष्टी मुळींच नसत. कांहीं देशांत परस्पर व्या- पार असे; परंतु तो थोडा असून करणें फारच कठिण असे. सां- प्रत जगांतील बहुतेक सर्व देशांतील दुर्मिळ पदार्थ पाहिजे त्या देशांत मिळतात. पाहिजे त्या देशांत जाऊन तेथील लोकांच्या रीतिभाति पाहतां येतात. उपभोगाच्या वस्तूंप्रमाणेच इतर देशांतून आपल्या देशांत ज्ञान आणितां येतें. या सर्व गोष्टींचे आदिकारण समुद्रगमन असें हाणण्यास हरकत नाहीं.
समुद्राच्या कित्येक गोष्टी ध्यानांत आणण्यासारख्या आहेत. कित्येकांस वाटतें समुद्राचें पाणी गोड असतें तर बरें होतें, परंतु ही चूक आहे. समुद्राचें पाणी खारट असल्यामुळे आपणास आव- श्यक जें मीट तें मिळतें. समुद्राचें पाणी खारट असल्यामुळे तें नासून त्यांत किडे पडत नाहींत. गलबतांच्या गतीसह खारट पा- जी अधिक हितावह आहे. समुद्राच्या पाण्याचा रंग सर्व ठिकाणीं सारखा नाहीं. समुद्रांतील प्राणी, झाडें, नद्यांच्या द्वारे त्यांत ये पृथ्वीवरील वस्तु, इत्यादिकांच्या योगानें पाण्याचा रंग बदलतो. समुद्र शांत असला म्हणजे पाणी चकचकीत दिसतें.
समुद्रास दिवसांतून दोनदां भरती व ओहटी येते. पौर्णिमा आणि अमावास्या यांच्या सुमारास भरती फार येते. भरती- ओहटीमुळे समुद्राचें पाणी चांगले राहून गलबतें जाण्यासही फार उपयोग होतो.
समुद्राचे बाह्य स्वरूप जसें आश्चर्यकारक आहे, तसेंच त्याचें आंतील रूपहि विलक्षण आहे. पृथ्वीवर जसे अनेक पदार्थ, अनेक प्राणी आहेत, तसेंच समुद्रांतहि आहेत. जमिनीपेक्षां