पान:गद्यरत्नमाला.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७२
गद्यरत्नमाला

.

कित्येक व्यर्थ वाटतात, त्या आवश्यक असतात. कित्येक वस्तूंचा उपयोग आपणांस माहीत नसल्यामुळे त्या क्षुल्लक वाटतात. लोहचुंबकाचा दगड एखाद्या अडाणी माणसाच्या हात दिला तर अंःयांत काय आहे ? असें ह्मणून तो फेंकून देईल. परंतु जर त्यास कोणीं सांगितलें कीं, या दगडापासून होकायंत्राची युक्ति कळली, नौकानयनाची कला याच्या योगानें सुधारली, यामुळेंच अमेरिकाखंडाचा शोध लावितां आला, तर त्यास काय वाटेल ? ज्या कित्येक क्षुद्र वस्तूंस आपण अज्ञानानें तुच्छ मा नितों, त्यांविषयींहि असेंच आहे. लक्ष्यपूर्वक जो पृथ्वीच्या रच- नेचा विचार करील त्यास परमेश्वराच्या चातुर्याचें प्रत्यक्ष ज्ञान झाल्याशिवाय राहाणार नाहीं. पाश्चात्य विद्वानांनी भूरचनेचें लक्ष्यपूर्वक अवलोकन करून नवीन भूगर्भशास्त्र उत्पन्न केलें आहे.

समुद्र.


 प्राचीन काली नौकानयनाची कला माहीत नव्हती तेव्हां लोकांस समुद्र फार भयंकर वाटे. परमेश्वरानें ही पृथ्वीची मर्या - दाच केली आहे असे वाटे. आपणास समुद्र दिसतो त्यापलीकडे आपल्या देशासारखा देश असून तेथे आपणासारखी माणसें आहेत, असे कोणास तरी त्या काळीं वाटलें असेल काय ? समुद्र फार भयंकर वाटत होता, यांत आश्चर्य नाहीं; भय वाटण्यासारखें त्याचें स्वरूप आहे. वादळ होऊन पर्वतासारख्या लाटा उठूं लागल्या ह्मणजे किनान्यावर उभे राहून समुद्राकडे पहाण्याससुद्धां भय वाटतें. समुद्र जितका भयंकर आहे तितकाच हितकारक आहे. आज जगाची जी इतकी सुधारणा झाली आहे,तिला मुख्य कारण समुद्रगमन होय. समुद्रगमन नव्हतें तेव्हां जुन्या


१ याविषयी माहिती " नौकानयनाचा इतिहास या नांवाच्या पुस्तकांत आहे.