पान:गद्यरत्नमाला.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
गद्यरत्नमाला

.

-नक्षत्रमालांनी युक्त, शांत तेजोमय असा चंद्र यांच्या लक्षपूर्वक अवलोकनापासून जे मनास सुख होतें, त्याची गणना कोण करील ? तशीच मेघगर्जना, वादळ, हीं कोठें कांहीं नसतां एकाएकीं उत्पन्न होऊन सर्व जगास चकित करून टाकितात ! यापेक्षां दुसरें कोणते मोठे श्रर्य आहे ? पहा, आपल्या या भूगोलावरील चमत्कार तरी लहानसहान आहेत काय ? केवळ समुद्राचें अगा- धत्व आणि विस्तीर्णत्व हींच किती अद्भुत आहेत ? वसंतादि ऋतूंचे नियमित येणें, त्यापासून जगास भिन्नभिन्न काळीं भिन्न- भिन्न प्रकारची शोभा येणें, भिन्नभिन्न देशांतले भिन्नभिन्न प्राणी, मोठमोठी राष्ट्र उदयास येणें व लयास पावणें, या सर्व गोष्टी केवळ ज्याच्या इच्छामात्रेकरून होतात त्याचें सामर्थ्य मनांत आले असतां, जो आनंद होतो, त्यास कशाची उपमा देतां येईल ?
 वर सांगितलेल्या सृष्टिचमत्कारांचा विचार करून ईश्वराचें चातुर्य, कृपालुत्व व महत्व, मनांत आलें असतां, अंतःकरण भक्तिरसपूर्ण होऊन तल्लीन होणार नाहीं, असा कोण मनुष्य अ- सेल ? अनंत चमत्कारयुक्त अशा सृष्टींत केवळ पशुसामान्य इंद्रि यसुख भोगण्याकरितां आपणांस परमेश्वरानें उत्पन्न केले आहे, असें समजेल, त्यास नरपशु याशिवाय दुसरें काय नांव द्यावें ? सृष्टि- निरीक्षण हे ईश्वरज्ञानास मोठे साधन होय. तद्वारा जो ईश्वर- प्राप्तीचा उद्योग करील, तो इहपरलोकीं सुखी होईल.

भूरचना.


 पृथ्वीची रचना परमेश्वरानें फार चमत्कारिक केली आहे. वृश्चवनस्पत्यादि उत्पन्न होण्यास योग्य तजवीज केली आहे. तिज- मध्ये इतका घट्टपणा ठेविला आहे कीं,मोठमोठे वृक्षसुद्धां तिच्या आश्रयाने उभे राहतात. इतके असून तींत इतका शिथिलपणा आहे कीं तींत लहान झाडाच्याहि मुळ्या आंत . जाण्यास व त्यांच्या योगानें पाणी आकर्षण करण्यास हरकत होत