पान:गद्यरत्नमाला.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६
गद्यरत्नमाला

.

हाणपण येतें. भिन्नभिन्न मनुष्यांमध्ये शहाणपणाचा कमजास्त- पणा दिसतो; त्याचें मुख्य कारण बहुशः त्यांमधील विद्येची न्यूनाधिकता हैं होय. एक मनुष्य ज्ञानाच्या योगानें अनेकांस ताब्यांत आणितो.
 अज्ञानाची गोष्ट पहा किती वाईट आहे ती ? कोलंबस अमे- रिकेंत असतां त्याजबरोबरच्या लोकांच्या दुर्वर्तनामुळे तेथील रा- नटी लोकांचा युरोपियन लोकांवरून भाव उडाला. ते त्यांस पीडा देऊ लागले, तेव्हां कोलंबसानें ज्ञानाची युक्ति लढविली. त्यास ज्योतिषशास्त्र उत्तम येत होतें, त्यावरून उद्यां खग्रास सूर्य- ग्रहण आहे, हें त्यास एके दिवशीं कळलें. तेव्हां तो त्या अज्ञानी लोकांस ह्मणाला, पहा बरें, विचार करा; आह्मी तुह्मांस सांगत आहों कीं, आह्मी देवाचीं माणसें आहों, आह्मांस त्रास देऊ नका. असें असतां तुझीं आह्मांस त्रास दिला; त्यावरून देव फार रागावला आहे. उद्यां तुमचा देव सूर्य मुळींच उगवणार नाहीं हें भाषण ऐकून त्यांसहि आश्चर्य वाटलें. दुसरे दि- वशीं पाहतात, तों खरेंच सूर्य कोठेंहि दिसेना. तेव्हां ते लोक घाबरून कोलंबसाच्या पायां पडून देवाचा राग घालवा असें हाणूं लागले. कोलंबसास लागत होते त्या सर्व पदार्थांच्या राशी त्यांनी त्यापुढे घातल्या. ग्रहण सुटण्याच्या सुमारास कोलंबसानें त्यांस सांगितलें कीं, पुन तुह्मी आह्मांस त्रास देऊं नका; आतां मी देवाचा राग शमवितों. नंतर कांहीं वेळानें सूर्य रोजच्या सारखा दिसूं लागल्यावर ते लोक सुखी झाले, आणि कोलंबसाशीं बंद्या चाकराप्रमाणें वागू लागले. पहा, अज्ञान्यांवर ज्ञानाचा काय प्रभाव तो !
 मनुष्याच्या मनास कांहीं तरी व्यवसाय पाहिजे; ज्यास विद्या नाहीं, त्याचे बहुतेक व्यवसाय दुर्गुणांकडे वळणारे होतात. त्यांस रिकामपणा पुष्कळ सांपडतो, त्यामुळे तो दुर्गुणी व दुःखी होतो. अंगीं विद्या असली ह्मणजे शिकणें, शिकविणें, वाचणें, वगैरे