पान:गद्यरत्नमाला.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बालाभ्यास.

१६७


कांहीं तरी उद्योग पाठीमागे असतोच. त्यामुळे दुर्गुणांचा प्र वेश न होता, सदाचरण व सुख यांची वृद्धि होते.
 सर्व अवस्थांमध्ये तारुण्यावस्था विद्या शिकण्यास फारच योग्य होय. कारण, त्या वेळेस मनुष्याचें मन संसाराच्या का- ळजीनें अस्पृष्ट असतें. इतर गोष्टींकडे लक्ष पुरविण्याची गरज नसते. पाठ करण्याची शक्ति फार चांगली असते. बुद्धि वि द्यांची मूलतत्वें शिकण्यास योग्य असते. हेंच मूलतत्वांचें शिकणें मोठेपण शुष्क वाटतें. त्यामुळे त्यापासून होणाऱ्या फलास लहानपण अभ्यास न करणारे मुकतात. लहानपणीं मन शुद्ध असतें, त्यामुळे जे सांगितलें त्याचा ठसा त्यावर चांगला उठतो. मोठा मनुष्य कांहीं शिकूं लागला म्हणजे त्याचे मनांत दुसऱ्या प्रकारचे अनेक तरंग उत्पन्न होऊन त्यास मुख्य विषय समजत नाहीं. ग्रहण केलेला विषय पुष्कळ वेळ ठेवण्याची योग्यता लहानपणी असते. अंगीं वयाचा लहानपणा असल्यामुळे कोणासहि विचारून आपले अज्ञान घालविण्यास अडचण नसते. वयाने मोठे झालेले कित्येक अडाणी मनुष्य, हं: ही एवढीशी गोष्ट यास समजत नाहीं. असें लोक ह्मणतील हाणून आपलें अज्ञान झांकून हृदयरूप फडताळांत घालून कुलुपांत ठेवितात.
 सदाचरणाची संवय लागण्यासहि लहानपण हा उत्तम काल आहे. लहानपणीच सदाचरण चांगलें ही गोष्ट हृदयांत चिं- बली असली तर पुढे मनुष्यांचें मन बिघडण्याची विशेष भीति नाहीं. इहलोकच्या सदाचरणानें परलोकीं सुख होतें, त्याप्रमाणें तारुण्यांत योग्य रीतीनें वागलें असतां, झातारपणीं मनुष्य सुखी होतो. याकरितां साधूचें वचन आहे, जेणेकरून झाता- रपणीं सुख होईल तें पूर्ववयांत करावें. परलोकीं सुख होईल असें बालपणापासून मरणापर्यंत आचरण करावें.

पूर्वे वयसि तत्कुर्याद्येन वृद्धः सुखं वसेत् ॥


यावज्जीवेन तत्कुर्याद्येनामुत्र सुखं वसेत् ॥ १ ॥