पान:गद्यरत्नमाला.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बालाभ्यास.

१६५


येते; परंतु वाळून त्याची विरी गेल्यावर हात लावावा तेथें तुकडा पडून त्याचें कांहीं होत नाहीं. असें होऊन पुनः ती माती उप- योगी पडत नाहीं. त्याप्रमाणे लहानपणी योग्य अभ्यास न केल्या मुळें बुद्धि एकदा मंद झाली ह्यणजे पुढे त्या मनुष्यास कांहींच समजत नाहींसें होतें. अमुक विषय लहानपणीं अमुक वेळेस अमक्यापाशीं शिकत होतों, त्या वेळेस आपणास भराभर समजत होतें, त्या वेळेस यांत कांहीं कठीण नाहीं असें वाटे; परंतु आतां कांहीं ध्यानांत येत नाहीं असें ह्मणणारे पुष्कळ सांप- इर्त ल. परंतु उपयोग काय ? वाळलेल्या मडक्याचा कांठ कोटून लवणार ?
 लहानशा बीपासून मोठा वृक्ष होतो, त्याप्रमाणेंच बालाभ्या- साची दहाबारा वर्षे आहेत; तीं जर चांगली घालविलीं तर मनुष्यास पाहिजे तो उद्योग मोठेपणी करितां येईल. ज्ञान अनंत आहे, त्याचें संपादन जन्मांत संपणार नाहीं. मोठेपण इतर व्यवसा- यांत पुष्कळ वर्षे जातात. तशींच बालपणीं गेलीं ह्मणून काय झालें ? असें ह्मणतां येत नाहीं. बालपणीं पुष्कळ अभ्यास करून शिकणे संपवावयाचें असें नाहीं, कारण, असें तर होणेंच नाहीं. परंतु बालपण हा बीजारोपणाचा काल आहे. पेरणीच्या वेळेस बीं पेरलें नाहीं तर पुढे पाऊस चांगला लागला तरी हंगाम चां- गला कशाने होणार ? शेतांत एक धान्य विपुल पिकलें तर त्याच्या योगानें दुसरें आपणास पाहिजे तें मिळवितां येतें. त्या- प्रमाणे लहानपणीं पुष्कळ अभ्यास करून एकच विद्या मनुष्य शिकलेला असला तरी तीपासून अशिक्षित मनुष्यांपेक्षां त्याच्या मनास अधिक ग्राहकता येते. मनुष्य वयाने कितीही मोठा झाला तरी विद्येशिवाय त्याचें बालत्व जात नाहीं. ज्ञानाचा प्रकाश मनोमंदिरांत प्रविष्ट झाल्याशिवाय तमोनाश कधीं व्हावयाचा नाहीं. विद्येशिवाय मनुष्याची विचारशक्ति व न्यायबुद्धि वाढत नाहीं. शहाण्यांनीं लिहिलेले ग्रंथ वाचून मनुष्याचे अंगीं श