पान:गद्यरत्नमाला.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६४
गद्यरत्नमाला.


होते. इंग्लंद देशांत सर ऐझाक न्यूतन म्हणून एक मोठा अप्रतिम तत्त्वज्ञानी होऊन गेला. त्यानें ज्योतीप, गणित इत्यादि शास्त्रांत अनेक नवीन शोध केले, त्यास लोक विद्वान ह्मणूं ला- गले तेव्हां त्यानें सांगितलें कीं, 'एकंदरीत विश्वाच्या मानानें पाहिलें तर समुद्रकिनाऱ्यावर जे असंख्य वालुकाकण आहेत, त्यां- तल्या एकाइतकें सुद्धां अद्याप माझें ज्ञान झालें नाहीं. ' पूर्ण शहाणपणा परमेश्वराशिवाय कोणाच्याच अंगीं नाहीं; परंतु जो आपली खरोखर योग्यता किती आहे हें समजतो, तोच जगांत मोठा शहाणा होय. जगांत भांडणे, कज्जे, युद्धे, लढाया, वगैरे जे अनर्थ होतात, त्यांस कारण, लोक आपली खरी योग्यता सम- जत नाहींत हैं होय. एका जुन्या पंडितानें झटले आहे कीं, सर्व विद्यांचा उद्देश मनुष्याने आपणास ओळखावे हा होय. स्त्रिया, पुरुष, वृद्ध, तरुण, या सर्वांच्या अंगीं नम्रता अवश्य पाहिजे, नम्रतेच्या योगानें दुर्गुण झांकले जातात. सद्गुणांस दुप्पट शोभा येते. अंगीं लीनता नसली तर कितीही शास्त्र पढलीं तरी व्यर्थ. जो लीन झाला त्यानेंच विद्येची रुचि घेतली असें समजावें. त्यासच ज्ञानापासून मोठा लाभ होईल.

वालाभ्यास.


 बालाभ्यास पाहिजे, असें हाणतात, तें अक्षरशः खरें आहे. तारुण्यासारखा ज्ञान संपादण्यास कोणताच काल नाहीं. ज्यांस बाळपणीं शिक्षण मिळालें नाहीं, अथवा शिक्षणाची सोय असतां ज्यांनीं ती व्यर्थ घालविली, त्यांस पुढे किती पश्चात्ताप होतो, कोणतीहि गोष्ट समजून घेण्यास ते किती अयोग्य असतात, चार शहाण्या लोकांत बसले ह्मणजे त्यांची कशी फजिती होते, याचा सर्वास अनुभव आहेच. बालपण हें कुंभाराच्या मा- तीच्या गोळ्यासारखें आहे. मातीचा गोळा चांगला ओला आहे तोपर्यंत त्याचें कुंभारास पाहिजे त्या आकाराचें मडकें करतां