पान:गद्यरत्नमाला.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नम्रता.

१६३


देशास परदेशाच्या लोकांपासून सुवर्णभूमिका हें नांव प्राप्त झालें नसतें. पाणिनि, गौतम, कणाद, कपिल, जैमिनि, व्यास, बाल्मिकि कालिदास, इत्यादि आर्य या विशेषणास पात्र असे जे ग्रंथकार ते केवळ पोटभरू असते तर आज मोक्षमुल्लर यांसारख्या रसिक युरोपियन लोकांच्या मनांत प्राचीन आर्य लोकांविषयीं प्रेम- पाझर सुटला असता काय? कोलंबसासारखे पुरुष निर्वाहावर लक्ष देणारे असते तर, अमेरिकेचा शोध लागून जग असें अलं- कृत झालें असतें काय ? शिवाजी स्वसुखाकडे पाहणारा असता, तर मराठ्यांस मुसलमानांपासून कोण सोडविता ? मराठ्यांचे राज्य हा शब्द तरी उत्पन्न झाला असता काय? अस्तु. अशीं उदाह- रणें लाखों सांपडतील. आजर्यंत जगांत विद्या, शौर्य, इत्यादि गुणांनी जे पुरुष उदयास आले, त्यांच्या प्रसिद्धीचें आदिकारण शोधून काढूं लागलों तर मोठा उद्योग याशिवाय दुसरें सांपड- णार नाहीं. दुसरी कारणे असली तरी तीं गौण होत. केवळ स्व- हिताचाच उद्योग करणारा मनुष्य आळशी नसला तरी त्याचा उद्योग मांजराच्या दुग्धप्रातीच्या उद्योगाप्रमाणेच होय. प्रा- माणिकपणाने आपला निर्वाह करून जो कांहीं तरी थोडा पर- हितासाठीं उद्योग करतो, तोच खरा उद्योगी होय.

नम्रता.


 अंगीं नम्रता असणें हें शहाणपणाचे चिन्ह होय. 'विद्या द- दाति विनयम्' असें वाक्य आहे. यावरून असें समजलें पाहिजे की, ज्याच्या अंगीं नम्रपणा आहे, त्याच्या मनावर मात्र विद्येचा परिणाम झाला. दैववशात् अंगीं मोठें शौर्य असले किंवा ए कादी मोठी विद्या साध्य झाली तथापि तिजविषयीं गर्व नक- रितां एकंदर जगाची स्थिति पाहिली असतां आपण किती क्षुल्लक आहों असें मनांत आणून नम्र असतो तोच खरा विद्वान होय. जगांत आजपर्यंत जे खरे विद्वान होऊन गेले ते सर्व या प्रकारचे