पान:गद्यरत्नमाला.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आळस.

१६१


याच कारणानें जगांत अनेक गुन्हे उत्पन्न होतात. असे लोक असल्यामुळे उद्योगी व प्रामाणिक मनुष्यांस विनाकारण त्रास होतो. याच कारणामुळे श्रम करून पोट भरणाऱ्या प्रामाणिक प्रजेपासून कर घेऊन लोकांच्या रक्षणाकरितां, राजास चौक्या, नाकीं, शिबंदी, तुरुंग ठेवावे लागतात. आळशी मनुष्याचे दोन परिणाम होतात. एक, तो कांहीं श्रम न केल्यामुळें नीच स्थितीस पावून दारिद्र्यानें व दुःखानें व्यापून मरून जातो. दुसरा, आळशी मनुष्य जात्या बळकट असल्यास नानाप्रकारच्या लबाड्या व लुच्चेगिऱ्या करून लोकांस त्रास देऊन चोया चहाड्या करून, दरवडे घालून, वाटा मारून, सुखाची इच्छा करितो. बहुशः अशा प्रकारच्या लोकांनीच तुरुंग भरून गेले आहेत. फांश गेलेल्या लोकांत असेच पुष्कळ सांपडतील. हे आळसाचे व दुर्गुणांचे परिणाम प्रसिद्ध आहेत. हें पाहून तरी मनुष्यांनी सावध असावें.
 आळसापासून दुर्गुण जडतात हैं एकीकडे ठेविलें तरी त्या पासून तिळमात्र सुख प्राप्त होतें असें म्हणतां येणार नाहीं. कोणी म्हणेल कीं, अमुक गोष्ट केली आहे तिचें काय होईल, अमुक काम योजिलें आहे त्याचें कसें होईल, अशा उद्योगी मनुष्यास काळज्या व दगदगी असतात, तशा आळशी मनु- ध्यास मुळींच नसतात. तो निःकाळजी स्वस्थ असतो, हें तर अगदीच खोटें आहे. आळशी मनुष्यासारखी काळजी व अस्वस्थपणा कोणासच नसतो. सतत श्रम केल्यानें मनुष्य स्वस्थ नसतो हें खरें, तथापि श्रम केल्यानंतर जी विश्रांति मनुष्य घेतात तीपासूनच खरें सुख व स्वस्थपणा आहे. तीच खरी विश्रांति होय. वास्तविक पाहतां आळसासारखे उत्साह, सुख व स्वस्थपणा यांचा नाश करणारें दुसरें कांहींच नाहीं. जो श्रम करीत नाहीं त्यास विश्रांति म्हणजे काय हें कधीं कळणार नाहीं. मन नेहमी सत्कार्यात गुंतलेले असल्याशिवाय मनुष्य सुखी